HW News Marathi
महाराष्ट्र

गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी आता ऑनलाइन घेता येणार

मुंबई । गणेशोत्सव, नवरात्रौत्सव काळात मंडपांवरून अनेक मंडळांना दंड भरावा लागतो. तसेच मंडपाची परवानगी घेण्यासाठी मंडळांना मुंबई पोलीस वाहतूक पोलीस यांची स्वतंत्र परवानगी घ्यावी लागते. या सर्व प्रक्रियेला बराच अवधी लागतो. मात्र, गणेशोत्सव मंडळांची ही गैरसोय आता दूर होणार आहे. हि सर्व प्रक्रिया मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. portal.mcgm.gov.in (www.mcgm.gov.in) या संकेतस्थळावर सादर होणारा हा अर्ज स्वयंचलित पद्धतीने मुंबई पोलीस व वाहतूक पोलिसांकडून मंजूर होणार आहे. त्यामुळे मंडळांना घरबसल्या आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरून मंजुरी मिळविणे शक्य होणार आहे.

उत्सव काळात मंडप आणि प्रवेशद्वार उभारणी करण्याकरिता महापालिकेद्वारे परवानगी घेणे आवश्यक असते, तसेच यासाठी अर्ज करताना त्यासोबत मुंबई पोलिसांचे, वाहतूक पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील आवश्यक असते. याबाबत पूर्वी मंडळांना महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात स्वत: जाऊन अर्ज द्यावा लागत असे, तसेच हा अर्ज सादर करताना त्यासोबत पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्रदेखील स्वत: पायपीठ करून घ्यावे लागत असे. या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आॅनलाइन अर्ज सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे देण्यात आली.

आॅनलाइन पद्धतीने अर्ज करताना काही समस्या उद्भवल्यास त्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अधिकृत माहिती मिळावी, यासाठी महापालिकेच्या वरळी येथील अभियांत्रिकी संकुलातील माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गावात जास्त घोळक्याने लोक आले तर गावकऱ्यांनी पोलिसांकडे माहिती द्यावी

swarit

Hasan Mushrif Exclusive : राज्यभरात शिवसेना-भाजपची डाळ गळणार नाही !

News Desk

माझ्या रॅलीमध्ये जमलेली गर्दी ही भाड्याने आणलेली नाही !

News Desk