HW News Marathi
देश / विदेश

आयपीएस अधिका-याचा भाऊ बनला दहशवादी

श्रीनगर | काश्मीर खो-यातील तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. डोडा जिल्ह्यातील आबिद भट नावाचा तरुणही दहशतवाद्यांना मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आबिद गेल्या काही दिवसांपासून गायब आहे आणि तो दहशवादी संघटनेत गेला असल्याची माहिती पोलिसांना सोशल मीडियावरुन मिळाली आहे.

जम्मू कश्मीरमध्ये आयपीएस अधिका-याचा भाऊ दहशवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असे या आयपीएस अधिका-याचा भावाचं नाव आहे. शमसुल दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे. शमसुल 22 मेपासून श्रीनगर विद्यापीठातून गायब झाला होता. कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला. रविवारी बुऱ्हाण वाणीच्या मृत्यू दिवसानिमित्त हिजबुलने आपल्या नव्या साथीदारांची यादी आणि फोटो जारी केले. त्या यादीत शमसुलचा समावेश आहे.

शमसुल मूळचा शोपियन भागातील द्रगुड गावचा रहिवाशी आहे. तो काश्मीर विद्यापीठात उनानी मेडिसिनचा अभ्यासक्रम शिकत होता. पोलिसांकडून याबाबत शोध घेतला जात आहे. मात्र एक भाऊ देशसेवा करत असताना दुसरा भाऊ देशद्रोही बनल्याने अनेकांना धक्का बसला आहे. शमसुल 2012चे आयपीएस अधिकारी इनामुल हक यांचा भाऊ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Nirbhaya Case : आरोपींच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती

swarit

बलात्कार्यांना २१ दिवसांत फाशी ‘महाराष्ट्रात राबवणार ‘आंध्र पॅटर्न’

News Desk

केंद्र सरकारकडून कृषीसह लघु-मध्यम उद्योगांना दुसरे आर्थिक पॅकेज मिळू शकते ?

News Desk
मुंबई

मुंबईतील जेल भरो आंदोलनाला अल्प प्रतिसाद

swarit

अपर्णा गोतपागर | गेल्या काही दिवसांपासून संपुर्ण राज्यभरात आरक्षणाच्या मुद्यांवरुन मराठे आक्रमक झाले आहेत. औरंगाबाद मधील आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्या सत्र थांबता थांबेना. चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीला हिंसक वळण लागले होते. हे आंदोलन इतके हिंसक होते. की, चाकणमध्ये जमाव बंदी लागू करावी लागली.

मराठा आंदोलकांपैकी काहींनी आत्महत्या केल्यामुळे बुधवारी मराठा क्रांती मोर्चाकडून जेल भरो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात काही ठिकाणी या आंदोलनाला विषेश प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी अल्प प्रतिसाद मिळाला. ज्या आझाद मैदानात लाखोंच्या संख्येने मराठे मुक मोर्चाला जमले होते तिथे केवळ २५ मराठा आंदोलक जेल भरो आंदोलना दरम्यान पहायला मिळाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबईतील आझाद मैदानात आज जेल भरो होणार आहे. या पार्श्वभुमीवर मैदानात कडकोट बंदोबस्त करण्यात आला. यासाठी पोलिसांची मोठी तुकडी आणि रैपिट कंट्रोस फोर्स(RCP) आंदोलकांना रोखण्यासाठी बोलविण्यात आली होती.तसेच आंदोलकांना पागविण्यासाठी पाण्यांच्या टॅकर दाखल झाले होते.जेल भरो सकाळी ११ वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार होती. परंतु १२ वाजेर्यंत एक ही आंदोलक मैदानात दाखल झाला नाही. दुपारी १२नंतर २५ ते ३० जणांची मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले.

सरकारविरोधी घोषणाबाजी

हे आंदोलक मैदानात दाखल झाले. हे सर्व जण एक मराठा लाख मराठा, सरकार आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, कोण बोलते देणार घेतल्याशिवाय राहत नाही, या सरकारचे करायचे काय खाली डोकेवर पाय,

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी

“मुंबईत हे पहिले मराठ्यांचे जेल भरो आंदोलन आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मराठा तरुणांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारने ते तात्काळ मागे घ्यावे, ज्या तरुणी आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्यांना सरकारने ५० लाख रुपये तर, जखमींना १० लाख रुपयाची मदत देण्यात यावी. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मराठा आंदोलक जेलभरो आंदोलन करणार असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक केदार सुर्यवांशी यांनी एच. डब्ल्युशी बोलताना सांगितले.”

Related posts

एल्फिन्स्टन पुलाचे उद्घाटन, मुख्यमंत्र्यांचा रेल्वेतून प्रवास

News Desk

मेट्रो-३ मार्गिकेचे नयानगर-दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk