HW News Marathi
मुंबई

कल्याण-डोंबिवली पालिकेचे मुख्यालय अनिधकृत

डोंबिवली | कल्याण-डोंबिवली पालिकेचे मुख्यालय अनिधकृत असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे. माहितीच्या आधिकारतून पालिकेच्या मुख्यालयाबाबतची माहिती उघडकीस आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मुख्यालय आहे.

कल्याण-डोंबिवली मुख्यालयात प्रशासकीय आणि महापालिका भवन आहे. या इमारती लागूनच अत्रे रंगमंदिर आणि झुंजारराव व्यापारी संकुल आहे. या तिन्ही इमारतीत खेळाचे मैदान आणि स्टेडियमच्या आरक्षित जमिनीवर बांधण्यात आल्या आहेत. तसेच आरक्षित भूखंडावर इमारती बांधताना त्यांनी शासनाकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

शासनाने २००७मध्ये यांची चौकशी करण्यासाठी अग्यारी समितीची स्थापना केली होती. या समितीने २००९ मध्ये शासनाला सादर केलेल्या अहवालात पालिकेचे मुख्यालय अनधिकृत असल्याचे म्हटेल आहे. कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आणि विवेक कानडे यांनी या अहवालाची प्रत समोर आणली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुक निधी उभारण्यासाठी म्हाडाच्या वसाहती खाजगी बिल्डर्सना विकल्या का?

News Desk

इंद्रायणीकाठी विवाहितेसह प्रियकराने संपविले जीवन

News Desk

ब्रेकिंग | भिवंडीत ऑईल गोदामाला भीषण आग

News Desk