HW News Marathi
राजकारण

भाजपाच्या या निर्णयामागे संघाचा हात ?

नवी दिल्ली | जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या निर्णयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे बोलले जात आहे. काश्मीरमध्ये सत्ता प्रस्थापित करताना पीडीपीसोबत भाजपाने युती केल्यामुळे संघ नाराज होता. त्यातच काश्मीरमध्ये बिघडत चाललेली स्थिती आणि कट्टरतावादाकडे असलेला काश्मीरी तरुणांचा वाढता ओढा यामुळे संघ चिंतेत होता.

गतवर्षी वृंदावन आणि नुकत्याच सुरजकुंड येथे झालेल्या संघाच्या बैठकीत या विषयांवर मोठा खल झाला होता. त्यामुळे भाजपला संघानेच काश्मीरची सत्ता सोडण्यास सांगितल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी | अशोक चव्हाण

News Desk

‘मविआ’ सरकारला मोठा धक्का! उद्या बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

Aprna

काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे पद रद्द

News Desk