HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या इफ्तार पार्टीत माजी राष्ट्रपतींना निमंत्रण नाही

नवी दिल्ली | स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्याला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुखर्जी यांच्या उपस्थितीने राजकीय नेते मंडळींच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस मुखर्जी यांच्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत होते. काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचे मुखर्जी यांना निमंत्रण न दिल्यामुळे या नाराजीवर शिक्का मोर्तब झाला आहे.

त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले असून ही इफ्तार पार्टी १३ जूनला होणार आहे. या पार्टीत प्रणव मुखर्जीसह माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदं केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले नाही.

एका बाजूला काँग्रेस सर्व राजकीय पक्षांना इफ्तार पार्टीत सामील होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देत आहे. परंतु स्वत:च्या पक्षातील जेष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रण देण्यास विसर पडला आहे. की निमंत्रण देण्यास टाळाटाळ करण्यात आली. या इफ्तार पार्टीवरुन अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.

Related posts

रामदास आठवलेंनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट

swarit

जनधन खातेधारकांत महिलांची संख्या ५५ टक्के, केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती

News Desk

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला

swarit