HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे होणार उद्घाटन

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलेल्या शब्दाचा दुसरा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असून, लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी (३ एप्रिल) राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुखयमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे महामंडळ कार्यान्वित करून याच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पुणे येथे करण्यात येणार आहे.

पुणे येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय साकारले असून, अनेक वर्ष कागद व घोषणांवर राहिलेल्या महामंडळाला धनंजय मुंडे यांनी मूर्त स्वरूप दिले आहे. ३ एप्रिल रोजी रविवारी सायंकाळी ६ वाजता लोकार्पणाचा हा सोहळा सामाजिक न्याय भवन, येरवडा पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत, त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, विधानपरिषद उपाध्यक्षा नीलम ताई गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार वंदना ताई चव्हाण, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. अमोल कोल्हापूरचे खासदार गिरीश बापट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, बी. बी. ठोंबरे , सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांसह ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी इत्यादी उपस्थित राहणार असल्याची माहिती समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

ऊसतोड कामगारांची नोंदणी केलेल्या कामगारांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र देणार

अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.

आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपासाला सुरुवात

News Desk

बहुजन नेत्यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा चुकीची – पंकजा मुंडे

News Desk

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिकच्या विशेष गाड्या सोडा, शेलारांची मागणी

News Desk