HW News Marathi
देश / विदेश

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा घेतली शपथ

मुंबई। गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गोव्याच्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये प्रमोद सावंत यांचा शपथ विधी सोहळा पार पडला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गोव्याच्या शपथ विधी सोहळ्यासाठी भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. 

गोव्यात आज प्रमोद सावंत यांच्यासह आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गोव्यात एकूण ९ जणांचा शपथ घेतली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत ४० जागांपैकी २० जागा मिळवून भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. या शपथ विधी सोहळ्यादरम्यान गोव्यातील दहा हजार नागरिक उपस्थित राहतील, अशी सोय केली होती. तर एका स्टॉलवर पाचशे व्यक्ती, असे गृहीत धरून २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. 

प्रमोद सावत यांच्यासह आठ जणांना शपथ घेतली

1) विश्वजीत राणे

2) माविन गुदिन्हो

3) रवि नाईक

4) रोहन खंवटे

5) गोविंद गावडे

6) बाबूश मोन्सेरात

7) सुभाष शिरोडकर

8) नीलेश काब्राल

 

प्रमोद सावंत यांच्यासह इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह इतर अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. गोवा विधानसभा निवडणुकीत ४० जागांपैकी २० जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर ३ अपक्ष आमदारांनीही समर्थन दिल्याने भाजपच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली होती. कारण विश्वजीत राणे हेदेखील मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते. मात्र अखेर भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा प्रमोद सावंत यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुढच्या ८ दिवसांत शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवणार, कर्नाटक सरकारचे आश्वासन

News Desk

निर्भया प्रकरणातील दोषीच्या शिक्षेवरील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

राधे माँ यांचे जुन्या आखाड्यात पुनरागमन !

News Desk