HW News Marathi
महाराष्ट्र

हिजाब प्रकरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार; कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत! – ओवेसी

मुंबई | हिजाब बंदीला विरोध करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हिजाब वादा प्रकरणावर कर्नाटकाने मोठा निर्णय दिला आहे. “शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य आहे,” असे कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणी  एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णायवर सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांनी सांगितले. 

यापूर्वीही ओवेसींनी ट्रिपल तलाक आणि अयोध्या प्रकरणात सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. औवेसी म्हणाले, “हिजाब बंदीच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर मी असहमत आहे. मग कोणताही गुन्हा झाला ? की, संविधानात मूलभूत रचना आहेत. यानुसार असहमती दर्शवणे गैर आहे का?, तुम्हाला त्रास का होतो, आम्ही आमची असहमती दर्शवणार. आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम्ही  सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

नेमके काय आहे प्रकरण

कर्नाटकामधील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथे सरकारी कनिष्ट महाविद्यालयात हिजाब वरून वाद सुरू झाला. महाविद्यालयात हिजाब परिधान करून प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. कारण कर्नाटक सरकारने ड्रेस कोडसंदर्भात जारी केलेल्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आदेश महाविद्यालयाने दिले आहे. यानंतर मुस्लिम विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या परिसर बाहेर उभे करण्यात आले. यामुळे मुलींनी महाविद्यालयाच्या गेटबाहेर निदर्शने केली. आणि या मुलींचा निषेध करण्यासाठी हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. यानंतर हिजाब प्रकरण किती के चिघळले की, याचे पडसात देशभरात पडले. हिजाब बंदीविरोधात देशभरात मोठ मोठे आंदोलन सुरू झाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk

आता ग्रामीण जनतेला गाजर

News Desk

गोंदिया जिल्ह्यात महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Manasi Devkar