HW News Marathi
महाराष्ट्र

प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा; गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

मुंबई | पोलीस बदलीत घोटाळा आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटा गुन्हा करण्याचे षडयंत्र करणारा पेन ड्राईव्ह  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दिला होता. यात थेट विशेष सरकारी वकिल प्रविण चव्हाण फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर प्रविण चव्हाण यांनी त्यांच्या वकिलपत्राचा राजीनामा दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सभागृहात दिली.  या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गृहमंत्र्यांनी सीआयडीकडे देणार असल्याची माहिती विधानसभेत दिली. परंतु, पेन ड्राईव्ह केस सीबीआयकेड द्यावी, अशी मागणी फडणवीसांनी सभागृहात केली. यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग होता. 

पेन ड्राईव्ह केस सीबीआयकडे न दिल्याने भाजपने सभात्याग केला आहे. सभागृहात पेन ड्राईव्ह प्रकरण सीबीआयकडे द्यावी,अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपच्या आमदारांची सरकारविरोधात घोषणाबाजी केली. परंतु,  हे प्रकरण सीबीआयकडे न दिण्यासाठी राज्य सरकारकडे आठवड्याभराचा कालावधी दिला आहे. यानंतर आम्ही न्यायालयात जावू, असा इशारा ही फडणवीसांनी सरकारला दिला आहे.

वळसे पाटील म्हणाले, “फडणवीसांनी दिलेल्या पेन ड्राईव्हचा तपास आपणच करणार आहोत. या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनी आपल्या वकिलपत्राचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाची सीआयडीकडे चौकशीसाठी सोपवण्यात येणार आहे. यातून नक्की वस्तुस्थिती बाहेर येईल, अशी मला आशा आहे. असे ते सभागृहात म्हणाले. गेल्या काही  दिवसांपूर्वी फडणवीसांनी सभागृहात पहिला पेन ड्राईव्ह देताना सरकारी वकिलांवर आरोप केले. फडणवीस म्हणाले, “गिरीश महाजन यांच्याविरोधात गुन्हा कसा नोंद करायचा आणि एफआयआर नोंद करणे, खोटे साक्षीदार तयार करणायेच काम सरकारी वकिलांनी केले. खोट्या साक्षीदारांना कशा घ्याच्या आणि त्यांना पैसे कसे द्याचे यांचा संपूर्ण घटनाक्रम या व्हिडिओमध्ये आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे

Aprna

अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनातून भाजपवर टीका

News Desk

आपला न्याय हक्काचा संघर्ष सुरूच ठेवावा, तीच खरी बाबासाहेबांना मानवंदना! – गोपीचंद पडळकर

Aprna