HW News Marathi
महाराष्ट्र

दप्तराविना शाळा! अनोख्या उपक्रमातून परिवर्तनाचे धडे

अर्धापूर | मुलांच्या पाठीवरचे दप्तरांचे ओझे एक दिवस तरी दूर व्हावे, विद्यार्थ्यांना आठवड्यातील एक दिवस दप्तराविना आनंददायी शिक्षण मिळावे. यासाठी दर शनिवारी मुलांनी शाळेत या दप्तराविना ही संकल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारवाडी (ता. अर्धापूर) येथे गेल्या तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.

विविध कलागुणांना मिळतोय वाव

नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील कारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक संतोष राऊत व सहशिक्षक बालाजी दूधंबे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कला, कार्यानुभव, शालेय शिक्षण, सहल, माती पासून विविध मूर्ती बनविणे, शाळा व गाव परिसरात विविध झाडे लावणे. यासाठी सीड बॉल प्रात्यक्षिक, वृक्ष लागवड व जोपासना या विषयावर आधारित मुलांना उपजत कलागुणांना संधी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवारफेरी व वनभोजन

शनिवारी शिवारफेरीच्या माध्यमातून वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रामुख्याने शेतीविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये विविध झाडांची, पक्षाची, प्राण्यांची तसेच रब्बी हंगामातील पिकाची माहिती करून दिली. यावेळी मुलांनी आपल्या अंगी असलेली कला सादर केली. गाणी व विविध पक्षाचे आवाज काढले तसेच गाणी गाऊन निसर्गाच्या सानिध्यात चिमुकल्यानी शिक्षणाचे धडेही गिरविले.

६०३ दिवसात एकही दिवस सुट्टी नाही..!

मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी मुलांशी गप्पा नावाने मागील ६०३ दिवसांपासून एकही दिवस सुट्टी नसलेला ‘ऑनलाईन फ्री क्लास’ घेतला जातो. यामध्ये अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी दररोज सकाळी साडे सात ते नऊ या वेळेत ‘झुम मीटिंगला’ जोडले जातात. :मुलीचे नाव घराची शान’ या उपक्रमाअंतर्गत गावातील प्रत्येक घरी जाऊन त्या घरातील मुलगी/महिलेचे नाव लिहून त्यांच्या पाट्या विनामूल्य तयार करून दिल्या आहेत. विद्यार्थी व गावकरी यांच्या मदतीने घरोघरी ह्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

‘मिशन आपुलकी’ च्या माध्यमातून मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनीलराव देबगुंडे यांनी शाळेला कलर प्रिंटर तर शिवराज पोटले या गावातील नागरीकांनी तात्पुरती वीजचे व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. अश्या उपक्रमांमुळे मुलांच्या कलाकौशल्य गुणांना चालना मिळेल ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

News Desk

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Aprna

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळीयेला भेट देणार, ग्रामस्थांची विचारपूस करणार

News Desk