बारामती | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अष्टविनायकातील प्रथम गणपती असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी, “गोवा राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊ दे”, असे साकडे त्यांनी मयुरेश्वराला घातले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मयुरेश्वर दर्शनासाठी मोरगाव येथे आले होते. शिर्डी येथील साईबाबा व रांजणगाव येथील महागणपती दर्शनानंतर ते मोरगाव येथे निवडक कार्यकर्त्यांसमवेत आले होते.
प्रमोद सावंत यांनी श्रींची पूजा, अभिषेक व आरती करुन मंदिर परीसरातील विविध मुर्तींचे दर्शन घेतले. यावेळी पुजारी कौस्तुभ वाघ, गजानन धारक, महेश गाडे, भाजपाचे रवींद्र साळवे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी मंदिर परिसरात झालेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यानंतर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी त्यांचा शाल व श्रींची प्रतिमा देऊन तर सरपंच निलेश केदारी यांनी श्रीफळ व श्रींची प्रतीमा देऊन सन्मान केला.
उपस्थित पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले की, “गोवा राज्यात भाजपाचे स्पष्ट बहुमत असणारे सरकार येणार आहे . तसेच जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी मिळेल असे साकडे त्यांनी मयुरेश्वरास घातले.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.