HW News Marathi
महाराष्ट्र

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला या दोषी आढळून आल्या आहेत. यानंतर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात आज (२६ फेब्रुवारी) रश्मी शुक्ला यांच्याविरोधात टेलिग्राफ अॅक्ट अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. 

वळसे पाटील म्हणाले, “रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय नेत्यांचा फोन टॅपिग केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशना वेळी आवाज उठवण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने चौकशी केल्यानंतर राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग करणे हे चुकीचे असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.” 

“काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संजय काकडे, आशीष देशमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर ही रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण, यामुळे शुक्लांवर कारवाई केलेली नाही. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत फोन टॅपिंग करून परवनगी दिली जाते. पण, या फोन टॅपिंग करण्याची गरज नव्हती. शुक्लांनी कशासाठी फोन टॅप केला हे लवकरच सर्वांसमोर येईल,” असेही वळसे-पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संभाजीराजे, उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण यांची मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत बैठक

News Desk

४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!

News Desk

भाजपने जे केलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं ,उद्धव ठाकरेंची खंत

Ruchita Chowdhary