HW News Marathi
देश / विदेश

ED कडून दाऊदची बहिण हसिना पारकरच्या घरी छापेमारी

मुंबई | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संपत्तीसंदर्भात कराराशी निगडीत असलेल्या काही राजकीय नेते आणि त्यांच्या जवळील व्यक्तींची सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीकडून छापेमारी करणार असल्याची माहिती इंडिया टुडेने त्यांच्या सुत्रांकडून मिळाली आहे. माहितीनुसार, दाऊतची बहिण हसिना पारकरच्या कुटुंबियांच्या मुंबईतील घरी आज (१५ फेब्रुवारी) ईडीने छापेमारी  केली. ईडीकडून मुंबईच्या सी- वॉर्टमध्ये झापे टाकण्यात आले आहे. ईडीच्या छापेमारीमध्ये नक्की कोणत्या नेत्यांचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

दरम्यान,भाऊ इक्बाल कासकर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचे पथक जाणार असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दाऊतच्या संपत्तीशी एनआयए बाबत तपास करत आहे. भारत सोडून पळून गेलेला दाऊदच्या संपत्तीसंदर्भा यंत्रणा तपास करत आहे. मुंबईती डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे. पंजाक कनेक्शनचा वापर करत पाकिस्तानतील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान यावर्षीही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार

News Desk

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राइक’ होणार ?

swarit

मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार 

News Desk