HW News Marathi
महाराष्ट्र

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

मुंबई | मुंबईच्या सन्माननीय महापौरताईंचे पेंग्वीन प्रेम आज जगजाहीर झाले. स्वत: ५५० किमी प्रवास करत पेंग्वीनच्या भेटीला गेल्या. पण वरळी येथे सिलेंडर स्फोटात तडफडून जीव गमवलेल्या लहानग्या बाळासाठी साडे आठ मिनिटांचा प्रवास करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही, असा टोला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.  त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात हेही त्यांनी स्वताचे जाहीरपणे कबूल केले आणि युवराज यासाठी त्यांचं अभिनंदनही करतीलच अस त्यांनी जी गुजरातमध्ये मिळालेल्या आदरतिथ्याची तारीफ केली.

चित्र वाघ म्हणाले,  “ती मुळात आपली हिंदू संस्कृती आहे. पण आपल्याला सध्या सुल्तानशाहीच जवळीक वाटत असल्यामुळे हिंदूच्या परंपरेविषयी आपण भारावून जाणं स्वाभाविक आहे.आज सर्व मुंबईकरांना हे तर कळून चुकले आहे की सत्ताधारी सेना ही फक्त पेंग्वीनसाठी आणि हायवे कन्स्ट्रक्शनच्या भल्यासाठी काम करते आणि मुंबईकरांच्या दैनंदिन समस्येवरती त्यांना काही देणे घेणे नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशांत सिंह राजपूतच्या आत्म्हत्येवर अमृता फडणवीस आणि युवासेनेचे वरुण सरदेसाई यांच्यात ट्विटर वॉर

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात गोपीचंद पडळकरांचा हक्कभंगाचा प्रस्ताव

News Desk

HW Exclusive : मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणी मला अडकवण्यात मुख्यमंत्र्यांचा हात, दरेकरांचा आरोप

Aprna