HW News Marathi
Covid-19

राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झाली नाही! – अजित पवार

मुंबई | राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीवर चर्चाच झालेली नाही. आणि या सर्व बातम्या खोट्या असून यात काही तथ्य नाही, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात मास्क हटविण्याच्या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्री मास्क वापरण्यासंदर्भात आग्रही आहेत. इंग्लंडसारख्या देशांनी मास्कमुक्त केला होता. परंतु नंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यामुळे मास्क अत्यंत महत्त्वाचे आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.पुण्यात आज (२९ जानेवारी) कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.  

“पुण्यामध्ये गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांची संख्येत घट झालेली दिसत आहे. पुणे ग्रामीण भागात १५ ते १८ वयोगटातील मुलांची टक्केवारी ८६ वर आहे. सध्या पुणे जिल्ह्यात ९० हजार कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. तसेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची जितकी मागणी होती. त्या तुलने आताच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत त्यांची मागमी कमी आहे. जिल्ह्यात ८७ हजार कोरोना रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात १ कोटी ६१ लाख १६ हजार लोकांचे लसीकरण झाले आहे,ठ असे अजित पवार म्हणाले.  

मास्कची सक्ती हटवण्यात येईल, हा गैरसमज काढून टाकल पाहिजे – आदित्य ठाकरे

मास्कची सक्ती हटवण्यात येईल, हा गैरसमज काढून टाकल पाहिजे. आणि टास्टक फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्य सरकार निर्णय घेत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोरोना साथ संपल्याची कुठेही जाहीर केलेले नाही. तसेच आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनचा व्हेरिएंट सौम्य किंवा गंभीर आहे, असे सांगितलेले नाही. त्यामुळे आता सर्वांसाठी मास्क हेच शस्त्र आहे, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मास्कमुक्तीच्या प्रश्नावर काल (२८ जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ व्हिडिओमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

News Desk

CAPF पोलिसांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

News Desk

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या विक्रमी | राजेश टोपे

News Desk