HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! मुंबईत आज १ हजार ८५८ नव्या रुग्णांची नोंद; तर १३ जणांचा मृत्यू

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्ये घट पहायला मिळत आहे. मुंबई आज (२६ जानेवारी) गेल्या २४ तासांत १ हजार ८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे १ हजार ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनावर मात करण्याची संख्या वाढत आहे. मुंबईचा सध्या रिकव्हरी रेट ९६ टक्के इतका झाला आहे. 

मुंबईत सध्या २७ इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या आहेत. आज मुंबईत नोंदविलेल्या १ हजार ८५८ रुग्णांपैकी २३३ रुग्णांवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पालिकेकडे सध्या ३७ हजार ८३० बेड्सपैकी केवळ ३ हजार ११८ बेड वापरात आहेत. दरम्यान, मुंबईत एकूण ९ लाख ९८ हजार ६९८ रुग्ण कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत २२ हजार ३६४ रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण वाढीचा दर हा १८५ दिवसांचा आहे. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी योजना’ तयार करा !

News Desk

“उलट त्याच सगळ्यांना धमकावत असतात”, अरविंद सावंतांचा नवनीत राणांच्या आरोपांवरुन पलटवार  

News Desk

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Aprna