HW News Marathi
महाराष्ट्र

पुनम महाजन आजकाल कुठे आहेत; संजय राऊतांचा सवाल

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट केले होते. या ट्वीटवरून भाजप नेत्या पुनम महाजन फेसबुकवर पोस्ट करत राऊतांवर टीका केली आहे. यावर राऊत म्हणाले, “पुनम महाजन यांनी इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही. पुनम महाजन या भाजपच्या खासदार आहेत. पण, त्या आजकाल कुठे आहेत,” असा सवाल त्यांनी आज (२५ जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. राऊतांनी प्रमोद महाजन यांच्यावरील ट्वीट केलेले व्यंगचित्रनंतर डिलीट केले.

राऊत म्हणाले, “हे व्यंगचित्र आर.के. लक्ष्मण यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या पहिल्या पानावर छापून आले होते. त्यावेळी शिवसेनेची स्थिती काय होती. मी प्रमोद महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाही. त्यावेळी प्रमोद महाजन भाजपचे नेता होते. बाळासाहेब हे त्यांच्यावर प्रेम करत होते. प्रमोद महाजन यांची मुलगी पुनम महाजन मला माहिती नाही की, त्या सध्या कुठे आहेत, मला माहीत नाही भाजपच्या खासदार आहेत. पण तुम्ही पाहिले असेल की, भाजपमध्ये प्रमोद महाजन यांचे कुटुंब, गोपीनाथ मुंडे यांचे आणि मनोहर पर्रिकर यांचे कुटुंब, असो सर्वांना अंधारात ढकलले आहे. भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात?,  तर मी पण पूनमला विचारण्यास इच्छूक आहे की, भाजपमध्ये तुम्ही कुठे आहात. मी त्यांच्या वक्तव्य मनावर घेत नाही. त्यांना त्यांच्या वडिलांसंदर्भातील काही गोष्टी वाईट वाटले असेल तर मी पण अस्वस्थ आहे. त्यांच्या कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत.”

व्यंगचित्रात नेमके काय आहे


संजय राऊत यांनी ट्वीट करत एक व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसेच बाजूला एक छोटा स्टूल ठेवला आहे. त्यावर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असलेले दाखविले आहे. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असे, या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. हे व्यंगचित्र शेअर करताना ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असे कॅप्शन राऊतांनी दिली आहे.

 

पुनम महाजनचे फेसबुक पोस्ट

 पुनम महाजन यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांनी राऊतांवर टीका केली. पुनम महाजन म्हटले, “स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.”

    

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे आता संसदेचा मार्ग – अशोक चव्हाण

News Desk

“तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल”- सुधीर मुनगंटीवार

News Desk

अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया – संदीप देशपांडे

News Desk