मुंबई | उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा खुद्द उत्पल पर्रिकर यांनी आज (२१ जानेवारी) पत्रकार परिषदेतून घोषणा केली आहे. “मनोहर पर्रिकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा हा निर्णय आहे. मी भाजपविरोधात नाही, तत्वांसाठी माझी लढाई आहे. पणजीतील जनतेने मनोहर पर्रिकरांवर प्रेम केले आहे. माझ्याबाबत पणजीकरांना ठरवू द्या,” असे उत्पल पर्रिकरांनी पत्रकार परिषदेतून म्हटले आहे. मी माझ्या पक्षाची ऑफर नाकारली तर मग मी इतर पक्षांची ऑफर का स्वीकारणार?, असे म्हणत उत्पल पर्रिकर यांनी शिवसेना आणि आपच्या ऑफरबद्दल पत्रकारांना उत्तर दिले.
मी खूप अवघड मार्ग निवडला आहे. त्यामुळे लोकांना माझ्या करियरबद्दल खूप जणांनी चिंता व्यक्त केली आहे. माझ्या राजकीय भविष्याबद्दल कोणी चिंता करू नका, गोव्यातील जनता माझे चिंता करेल, असे ते म्हणाले. गेल्या वेळी सुद्ध मला संधी नाकारली आहे, आणि आताही नाकारली आहे. हे सर्व गोव्यातील लोकांना ही माहिती आहे, असा टोला ही उत्पल पर्रिकर यांनी भाजप गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी लगावाल आहे.
माझे राजकीय करिअर आता पणजीच्या लोकांच्या हातात आहे. मला कोणतेही पद आणि मंत्रीपदा मिळावे म्हणून निवडणूक लढत नाही. तर मूल्यांसाठी माझी लढाई आहे. ही लढाई कठीण आहे. मी उच्च शिक्षित आहे. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही’, अशी खंतही यावेळी उत्पल यांनी व्यक्त केलीय.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.