HW News Marathi
Covid-19

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा! – विजय वडेट्टीवार

चंद्रपूर | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल आपल्या सर्वांना लागली आहे. ही लाट आपल्या दारावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटे येत असतात. पण संकटात काळजी घेतली नाही तर ते अधिक गडद होते. शासन आणि प्रशासनाने तिसऱ्या लाटेसंदर्भात संपूर्ण तयारी केली असून या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला ब्रम्हपुरी येथे हिरवी झेंडी दाखविल्यानंतर प्रसारित संदेशातून ते बोलत होते. यावेळी ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार उषा चौधरी, प्रभाकर सेलोकार, विलास विखार, डॉ. नितीन उराडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे, असे सांगून वडेट्टीवार म्हणाले, रुग्णांसाठी संपूर्ण व्यवस्था प्रशासनाने केली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, ऑक्सिजनची आवश्यकता आदी बाबींची कमतरता पडणार नाही. विशेष म्हणजे आपण स्वत:ची काळजी घेतली तर रुग्णालयापर्यंत जाण्याची आपल्याला आवश्यकताच पडणार नाही. पुढील दोन महिने अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. यात नियमित मास्कचा वापर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेरून आलेल्या व्यक्तिंची माहिती देणे, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात संपर्क करणे आदी बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करा. संकटावर मात करण्यासाठी दक्ष राहा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कोरोनाच्या दोन संकटात आपण सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यातही तिसऱ्या लाटेचे संकट आपण सर्वांच्या सहकार्याने परतवून लावू, अशा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. यात कोव्हीडमध्ये मृत्यु झालेल्या कुटुंबासाठी सानुग्रह अनुदान, 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण यासोबतच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा समावेश होता. सदर चित्ररथांद्वारे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात जनजागृती करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

News Desk

दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

News Desk

कोविड वॉरिअर्सवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन, आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांविषयीच्या मानसिकतेत बदल !

News Desk