HW News Marathi
मनोरंजन

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात…

मेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. ते धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते.त्यांच्यातील आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामचे बालपण गेले.

सर्वधर्मसमान याची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर उमटली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांची भेट स्वामी शिवानंदांशी झाली. ”तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणि उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिकअभियंता बनले.

त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हॉवरक्रफ्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हॉ वरक्रफ्टचा तयारी केली. ‘नंदी’ हे त्यांचे नाव होते. पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हॉवरक्रफ्ट तयार करण्याची संधी मात्र मिळाली नाही. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले..

अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरु केले. रोहिणी या उपग्रहाणे सुरु झालेल्या हा प्रयत्न पृथ्वी,अग्नी, आकाश, नाग अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला.

डॉ. साराभाई, प्रा. मेनन,डॉ. राजा रामण्णा,डॉ. धवन, डॉ. ब्रम्ह प्रकाश यांचे कर्तुत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापुर्वक उल्लेख केला आहे. ”मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल” एका सभेत ते उद्गारले. त्यावेळी ते इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणार्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ व १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मकरसंक्रांत स्पेशल तिळाच्या करंज्या

News Desk

२५ जानेवारीला ‘फक्त’ ठाकरे सिनेमाच झळकणार

News Desk

अमित शहा स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमधील लाल चौकात फडकविणार तिरंगा ?

News Desk