HW News Marathi
मनोरंजन

देशातील युवाकांचे प्रेरणास्थान डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम

ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारतीय शास्त्रज्ञ आणि भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते आतापर्यंतचे अत्यंत लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात. १९५८ ते १९६३ दरम्यान अब्दुल कलाम यांचा संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला होता. आपले बालपण अथक परिश्रमात गेल्यानंतर विद्येच्या अखंड साथीने खडतर आयुष्य जगलेले डॉ. कलाम हे जगातील सर्वात मोठया लोकशाही देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून विराजमान झाले. डॉ. कलाम यांचा युवांवर अत्यंत दांडगा विश्वास होता. कलाम हे देशातील युवकांना सदैव प्रेरणा देत असत. भारत सरकारने डॉ.कलाम यांना ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

News Desk

नाताळ आणि शुभेच्छापत्रे…

News Desk

कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

News Desk
नवरात्रोत्सव २०१८

आव्हानांचा सामना करत ‘ती’ने केले स्वप्न साकार

News Desk

आजच्या आधुनिक काळात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. पुर्वीच्या काळात नौकरी करणारी स्त्री धाडसी मनाली जायची. आता परिस्थिती बरीच बदलली असल्याचे दिसून येते.आजच्या आधुनिक युगात पत्नीही पतीला अर्थिकदृष्ट्या हातभार लावत आहे. त्यामुळे अनेक पुरुषांना आपली पत्नी पुढे जात आहे याचा अभिमान वाटतो. आधुनिक विचार,बदलती जीवनशैली, उच्चशिक्षण यामुळे परिस्थिती बऱ्यापैकी बदलली आहे.

एक काळ असा होता की, जेव्हा महिला फक्त घरातील कामकाज आणि मुलांचे पालन-पोषण एवढेच काम करीत असत. पण आता ही परीस्थिती बदलेली दिसून येते. स्वातंत्र्याच्या लढाईपासूनच महिलांचा सहभाग दिसून येतो. कोणतेही क्षेत्र असो. महिलांचे योगदान असते. खेळ, व्यापार, संगीत आदी अनेक क्षेत्रांमध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत.

सध्या चर्चेत असलेल्या क्रीडा क्षेत्रात अनेक महिला झळकत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मेरी कॉम . दोन मुलांची आई असलेली मेरी कोम ही वयाच्या १८ व्या वर्षी महिला मुष्टियुद्ध स्पर्धक ठरली. मेरी कोमने अंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. एक मुलगी म्हणून बॉक्सिंग करण्यासाठी वडिलांनी घातलेली बंदी, बॉक्सिंगपटू बनण्याच्या तिच्या स्वप्नांची समाजाकडून उडवली जाणारी थट्टा, सरकारी व्यवस्थेकडून होणारी आडकाठी, लग्नानंतर आलेली मातृत्वाची जबाबदारी, असे अनेक प्रसंग तिच्या आयुष्यात घडले. पण या अशा प्रसंगांना ‘पंचिंग बॅग’प्रमाणे ठोसे लगावून ती पुढे चालत राहिली. आशियाई स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक जिंकणाऱ्या मेरी कोमची रिंगमधील वाटचाल वयाच्या ३४ व्या वर्षीही ऐन बहरात आहे.

मेरी कोमचा संपुर्ण जीवनप्रवास ही एका अनोख्या ध्यासाची आणि जिद्दीची कहाणी आहे. तीन मुलांना सांभाळण्याची जबाबदारीही ती योग्य रीतीने पार पाडते. ती खऱ्या अर्थाने ‘सुपरमॉम’ आहे. स्वत:च्या शारीरिक क्षमतेची असलेली जाण, हे तिचे वैशिष्ट्य. विश्रांती घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला झेपेल इतकाच सराव किंवा ताण ती शरीराला देते. कुठे थांबायचे याची योग्य जाण तिला आहे. त्यामुळेच कौटुंबिक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून ती सातत्यपुर्ण कामगिरी करत आहे.

मेरी कोमने २०१३ मध्ये पद्मभूषण मिळविले २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार ,२००७ आणि २००९ मध्ये राजीव गांधी पुरस्कार,२०१० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळविले

मेरी कोमच्या तंदुरुस्तीचे रहस्य.

१)सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत मिळून आठ तास सराव.

२)प्रथिने, जीवनसत्त्वे, काबरेहायड्रेट यांचे योग्य प्रमाण मिळेल असा आहार.

३)नियमित आणि ठरलेल्या वेळेत जेवण.

४)रोज १४ किलोमीटर धावणे, दोरीउड्या, व्यायाम.

५)पंचिग बॅग आणि स्पीड बॅग यांच्यावर ठोसे मारण्याचा सराव.

६)अकादमीतील खेळाडूंशी किंवा प्रशिक्षकांसोबत सराव सत्र.

७)दुपारच्या वेळेत व्यायामशाळेत शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने पुशअप व सिट अपचा सराव.

८)सायंकाळच्या सत्रात पुन्हा सकाळच्या सरावाची पुनरावृत्ती.

Related posts

नवरात्रोत्सवाची २९ वर्षांची अखंड परंपरा, चेतनाची माऊली

Gauri Tilekar

आजचा रंग पांढरा, ‘कात्यायनी’ रूपात घ्या देवीचे दर्शन

Gauri Tilekar

भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी

News Desk