HW News Marathi
मनोरंजन

युवांना ‘अग्निपंख’ देणारे डॉ. कलाम

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम हे फक्त भारताचे ११वे माजी राष्ट्रपती नसून एक महान वैज्ञानिक, प्रेरणादायक नेता होते. ते एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. विज्ञान क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात प्राविण्य गाजवणारे कलाम खूप संवेदनशील व साधे व्यक्तीमत्व होते. कलाम हे राष्ट्रपती,वैज्ञानीक आणि इंजिनीअर सुद्धा होते. त्यांचे प्रेरणादायक विचार आजही भारतातच नव्हे तर संपूर्ण जागात अत्यंत लोकप्रिय आहेत. अब्दुल कलाम हे आपल्या काम प्रति ध्येयनिष्ठ होते. त्यांच्यासाठी कोणतीही वेळ ही कामाचीच वेळ असे. ते आपला अधिकाधिक वेळ कार्यलयातच घालावत असतं. त्यांच्या विचारांसोबत त्यांची पुस्तकेही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ सारखे क्षेपणास्त्र स्वदेशी पद्धतीने बनवले.कलाम यांनी 2020 पर्यंत भारताचा विकासस्तर विज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक करण्याची विचार प्रणाली भारताला दिली होती.दक्षिण कोरियामध्ये यांच्या पुस्तकांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते.

भारत सरकारने त्यांना ,’पद्मविभूषण’ व 1998 मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देवून त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना अनेक किताब व मानसन्मान देखील दिले. कलाम यांनी आपले जीवन चरित्र ‘अग्नीपंख’ (विंग्स ऑफ फायर) आणि ‘गायडिंग सोल्स-डायलॉग ऑफ द पर्जन ऑफ लाईफ हि पुस्तके त्यांनी भारतीय तरुणांन मार्गदर्शन करण्यासाठी लिहिली. या पुस्तकात त्यांच्या बालपणपासून ते १९९९ पर्यंतचा जीवनप्रवास लिहिलेला आहे. मूळ रूपातील पुस्तकाची एकूण १३ भाषेत भाषांतरित असून त्यात हिंदी, गुजराती, तेलगु, तमिल, मराठी, मलयालम, कोरियन, चीनी या भाषांचा देखील समावेश आहे.

तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी १९३१ मध्ये जन्मलेला हा मुलगा म्हणजेच देशातील ’भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळविणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारला आहे.

अग्निपंख हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या तंत्रज्ञानाविषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे. सुरुवातीला त्यांच्या बालपणापासून ते वयाच्या ३२ वर्षा पर्यंतचा प्रवास यात लिहिले आहे. कलामांच्या कामाची कथा आणि भारतातील तांत्रिक विकास याचा उल्लेख आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये फिरते ग्रंथालय

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | नानांच्या बाप्पाचे आगमन

News Desk

समाजात विष पेरले गेले !

News Desk