नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे असलेला अर्थमंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे तात्पुरता देण्यात आला आहे. यामुळे पुढी आठवड्यात होणारा अर्थसंकल्पही गोयल सादर करण्याची शक्यता वर्तवली आहे. १ फेब्रुवारी रोजी यंदाचा वार्षिक अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली अनुपस्थित राहिल्यास गोयल हेच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Arun Jaitley will be designated as Minister without portfolio during the period of his indisposition or till such time he is able to resume his work as Minister of Finance and Minister of Corporate Affairs. https://t.co/qh80IPqD2E
— ANI (@ANI) January 23, 2019
तसेच अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेला गेले आहेत. अरुण जेटली यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिकवेळ अरुण जेटलींना अमेरिकेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे येत्या अंतरिम अर्थसंकल्पाला अरुण जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.