HW News Marathi
मनोरंजन

‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’, पंडित नेहरूंचे प्रसिद्ध भाषण

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री १२ वाजता संसदेतील भारतीय संविधान विधानसभेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू दिलेले भाषण हे “ट्रिस्ट विथ डेस्टिनी” या नावाने प्रसिद्ध आहे. २० व्या शतकातील हे सर्वात महान भाषण मानले जाते. पंडित नेहरूंचे हे भाषण म्हणजे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या विरोधात अहिंसक मार्गाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या विजयाचा सारांश आहे.

ट्रिस्ट विथ डेस्टिनी

“बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही भाग्य बदलण्याचा प्रयत्न (ट्रिस्ट विथ डेस्टिनी) केला होता. आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेतून मुक्त होऊ. जरी आपण पूर्णपणे मुक्त नाही तरीही हे महत्वाचे आहे. जेव्हा आज रात्री १२ वाजता संपूर्ण जग झोपलेले आहे, तेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य प्राप्त करून एक नवीन जीवन सुरू करणार आहे”, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले.

पुढे पंडित नेहरू म्हणाले कि, आता देशाचा जुलूम झालेला आत्मा स्वतःची गोष्ट सांगू शकतो. आम्ही संपूर्ण समर्पणाने भारत देशाला आणि भारतीयांना सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. इतिहासाच्या सुरूवातीस भारताने आपले शोध सुरू केले. त्याच्या भव्य यश आणि अपयशांमुळे किती शतके गेली हे त्यांना ठाऊक नाही.

परंतु चांगल्या किंवा दुर्दैवी भवितव्यामुळे ती कधीही त्या शोधाची दृष्टी विसरले नाहीत, शक्ती देणारी आदर्श विसरले नाहीत. आज आपण दुर्दैवी काळाची समाप्ती करतो आणि आपला भारत पुन्हा स्वत:ला शोधून काढतो आहे. आज आपण जे साजरे करतो ती म्हणजे एक पाऊल आहे. आणखी मोठा विजय आणि यश आपली वाट पाहत आहे. ही संधी समजण्यासाठी आणि भविष्यातील आव्हान स्वीकारण्यासाठी आपण सक्षम आणि शहाणे आहोत का?

स्वातंत्र्य आणि शक्ती जबाबदारी सोबत घेऊन येते. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी आम्ही श्रमांचे सर्व दुःख सहन केले आहे आणि या दुःखाची स्मृती आपल्या अंतःकरणात भरली आहे. त्यापैकी काही वेदना अजूनही जागृत आहेत. तथापि, आता भूतकाळ संपला आहे आणि तो आता भविष्यासारखे भासत आहे. पंडित नेहरूंनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, भविष्यात आम्हाला विश्रांती घेण्याची नाही तर सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. जेणेकरून आम्ही जे बोलतो ते पूर्ण करू शकू. लक्षावधी पीडितांना सेवा देणे म्हणजे भारताची सेवा करणे होय. याचाच अर्थ अज्ञान आणि दारिद्र्य निर्मूलन करणे, रोजगारसंधींमधील असमानता नष्ट करणे होय. जनतेच्या डोळ्यांमधून अश्रू अदृश्य होण्याची इच्छा ही आपल्या पिढीची सर्वात मोठी इच्छा आहे.

कदाचित हे आपल्यासाठी पूर्णपणे शक्य नाही, परंतु आपण लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले नाहीत आणि जर ते दुःखी असतील तर आपले कार्य संपले असे होऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. जेणेकरुन आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकू. हे स्वप्ने जसे भारतासाठी तसेच संपूर्ण जगासाठी देखील आहे. आज कोणीही स्वतःला पूर्णपणे वेगळे ठेऊन विचार करू शकत नाही. कारण आता सर्व राष्ट्र आणि लोक एकमेकांच्या जवळ आले आहेत. जशी शांतता विभागली जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे स्वातंत्र्य देखील विभाजित करता येत नाही. हे जग छोट्या भागांमध्ये विभागले जाऊ शकत नाही.

“आज योग्य वेळ आली आहे. एक दिवस जो भाग्याने ठरविला गेला आणि बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर भारत जागृत आणि स्वतंत्र आहे. आपला भूतकाळ आपल्याशी जोडलेला आहे. आमच्यासाठी एक नवीन इतिहास सुरू झाला आहे, एक इतिहास तयार होईल”, असे पंडित नेहरू म्हणाले. “आम्ही एक महान देशाचे नागरिक आहोत आणि साहसी प्रगतीपथावर आहोत आणि आम्हाला त्या उच्च गुणवत्तेवर जगण्याची गरज आहे. आम्ही सांप्रदायिकता किंवा संकुचित मनोवृत्तीला प्रोत्साहित करू शकत नाही. ज्या देशाचे लोक संकुचित विचार करतात तो कोणताही देश महान असू शकत नाही”, असे पंडित नेहरू म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात…

News Desk

‘ठाकरे’ सिनेमा प्रदर्शितच होऊ देणार नाही !

News Desk

#IndependenceDay | पूरग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर करु !

News Desk