HW News Marathi
Covid-19

राज्यातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची घोषणा

मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये आणि परीक्षांच्या बाबतीत राज्य सरकार काय निर्णय घेणार याची चर्चा सुरू असतानाच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहणार असल्याचं सामंत यांनी जाहीर केलं आहे. तरीही, या काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. शिवाय या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.

मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागीय आयुक्त, कुलगुरू, शिक्षण अधिकारी यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना व ओमिक्रॉन बाधित रूग्णांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व अकृषि विद्यापीठे, विद्यापीठांशी संलग्नित विद्यापीठे, स्वयंम अर्थसहाय्य विद्यापीठे, तंत्रनिकेतनचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर आज (५ जानेवारी) उदय सामंत यांनी महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच १५ फेब्रुवारीनंतर महाविद्यालयांबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी आगामी काळात बैठका घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करुन धार्मिक तेढ निर्माण केली”

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ६१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले 

News Desk

कोरोनापासून वाचण्यासाठी गोवा पॅटर्न अवलंबावा

News Desk