HW News Marathi
Covid-19

देशात गेल्या २४ तासांत २७ हजार कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई | देशात पुन्हा एकदा कोरोना डोकेवर काढत आहे. आणि आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्ण संख्येत देखील वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत २७ हजार ५५३ कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशात २८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच देशात १ हजार ५२५ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ८१ हजार ७७० रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यानुसार देशात सध्या १ लाख २२ हजार ८०१ कोरोना रुग्णांची संख्या आहे. 

सध्या देशात लसीकरण मोहिम अंतर्गत १४५ कोटी ४४ लाख १३ हजार ५ जनतेने कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहे. देशात काल (१ जानेवारी) २५ लाख ७५ हजार २२५ लसीचे डोस देण्यात आले. तर देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक असून त्या पाठोपाठ राजधानी दिल्लीमध्ये आहेत. गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत तिसरा क्रमांकवर आहेत. तसेच महाराष्ट्रात सध्या ओमायक्रॉनचे ४६० रुग्ण, दिल्ली ३५१ रुग्ण आणि गुजरातमध्ये १३६ रुगांची संख्या आहे.  

https://twitter.com/ANI/status/1477490650299858945?s=२०

मुंबईत एका दिवसात ६ हजार ३४७ कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ असून राज्यात काल (१ जानेवारी) ९ हजार १७० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ४७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत काल २४ तासांत जवळपास ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाच मृत्यू झाला आहे. तर ४५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मुंबईत ३१ डिसेंबर रोजी ५ हजार ६३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, मुंबईत आता २२ हजार ३३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छगन भुजबळ होम क्वारंटाईन, कार्यालयातील ६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना 

News Desk

Covishield Vaccine चा दुसरा डोस आता दोन महिन्यानंतर, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

News Desk

ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहिर

News Desk