HW News Marathi
Covid-19

भाजप नेत्या पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

मुंबई। राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यात राजकीय नेते मंडळींना देखील कोरोना रुग्णांची लागण होत आहे. आता माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत.

दरम्यान, २०१९ मध्ये सुद्धा पंकज मुंडेंना कोरोनाची लागण झाली होती. आता पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आता पुन्हा कोरोना डोकेवर काढू लागला आहे. तसेच राजकीय नेत्यांची विवाह सोहळा, अनेक राजकीय कार्यक्रमांना गेल्यामुळे  कोरोनाची लागण झाली, अशा चर्चा रंगल्या आहेत.

राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण

नुकतेच राज्यात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आहे. राज्यात १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिली, तर सरकार कठोर निर्बंध लावू शकते, असे स्पष्ट संकेत पवारांनी काल (१ जानेवारी) कोरोगाव-भीमा जयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १ लाख २४५ गुन्ह्यांची नोंद, तर ३ कोटी ७६ लाख ५३ हजार ६९४ रुपयांचा दंड

News Desk

पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्या १० हजारांचा टप्पा पार करणार

News Desk

राष्ट्रपती राजवट लादायची ठरलेच तर महाराष्ट्राचा क्रमांक १७ वा असेल!

News Desk