Site icon HW News Marathi

‘हिंदी ही राष्ट्रभाषा’ राज्य सरकारच्या ‘या’ जीआरमुळे नवा वाद

मुंबई | महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची फेररचना करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकार (Government of Maharashtra) सोमवारी (16 जानेवारी) निर्णयाचा जीआर काढला आहे.राज्य सरकारच्या जीआरमुळे (GR) नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘हिंदी ही राष्ट्रभाषा’, असा राज्य सरकारने जीआरच्या सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने अद्यापही कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही.  हिंदीही देशात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

राज्य सरकारच्या जीआरमध्ये म्हटले, “हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी व उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. उपनिर्दिष्ट क्र. १ च्या शासन निर्णयान्वये नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष / अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या उपनिर्दिष्ट क्र. २ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. सदर समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.” या जीआरवर महाराष्ट्र शासनाचे उपसचिव विलास रामराव थोरात यांच्या डिजिटल स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. या  जीआरमध्ये सोशल मीडियातून सर्वत्र टीका होत आहे.

जीआरमध्ये नेमके काय म्हणाले

महाराष्ट्र शासन

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग,
शासन निर्णय क्र. हिंसाअ ७०२२/प्र. क्र. ४७१ /सां. का. ४
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १६ जानेवारी, २०२३

वाचा :- १) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. हिंसाअ ७०२१/ प्र.क्र.६५/सां.का.४, दिनांक ४ जुलै २०२२

 २) शासन निर्णय, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग क्र. संकीर्ण २०२२/ प्र.क्र.६७/समन्वय, दिनांक ८ सप्टेंबर, २०२२

प्रस्तावना :-
हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी व उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे. उपनिर्दिष्ट क्र. १ च्या शासन निर्णयान्वये नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष / अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या उपनिर्दिष्ट क्र. २ च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आल्या आहेत. सदर समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-
या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करुन खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात येत आहेत.

अ) शासकीय सदस्य

१. मा. मंत्री (सांस्कृतिक कार्य) अध्यक्ष
२. सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग अध्यक्ष
३. सहसंचालक, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी  सदस्य सचिव

ब) अशासकीय सदस्य
१.डॉ. शीतला प्रसाद दुबे – कार्याध्यक्ष

2. डॉ. सुधाकर मिश्र – अशासकीय सदस्य
३. डॉ. प्रमोद शुक्ल – अशासकीय सदस्य
४. पल्लवी अनवेकर – अशासकीय सदस्य
५. यशार्थ मंजूल – अशासकीय सदस्य

६.आनंद सिंह – अशासकीय सदस्य
७. सुधा श्रीमाली – अशासकीय सदस्य

Exit mobile version