HW News Marathi
Covid-19

राज्यात काल ११ हजार ८७७ कोरोना रुग्णांची नोंद; मुंबईत ८ हजार रुग्ण

मुंबई। गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात काल (२ जानेवारी) ११ हजार, ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात मुंबईत ८ हजार ६३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या ५० रुग्णांचा यात समावेश आहे. तसेच २४ तासांत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्ण वाढीचा वेग शनिवारी (१जानेवारी) च्या तुलनेत रविवारी (२जानेवारी) २७ टक्क्यांनी वाढला आहे.

राज्यात काल ऑमायक्रॉनच्या ५० रुग्णांची नोंद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी ३६ , पिंपरी चिंचवड ८,पुणे ग्रामीण- २, सांगली- , ठाणे- १, मुंबईमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ५१० ऑमायक्रॉनचे रुग्ण राज्यात आहेत.

राज्यात नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागतमुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या सर्वाधिक आहे. राज्यात काल २ हजार ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापार्यंत राज्यात एकूण ६५ लाख १२ हजार ६१०जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

#Coronavirus : जितेंद्र आव्हाडांची कोरोनावर यशस्वी मात

News Desk