HW News Marathi
Covid-19

मुंबईत आज तब्बल १५ हजार १६६ नवे कोरोना रुग्ण

मुंबई | मुंबई कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. मुंबईत आज (५ जानेवारी) १५ हजार १६६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ हजार २१८ रुग्णांना रुग्णालयात दाखल झाले असून इतर बाकी जण घरीच विलगीकरणात असल्याची माहिती बीएणसीने दिला आहे. सध्या मुंबईत ६१ हजार ९२३ रुग्णांची संख्या ऐवढी झाली आहे. तर मुंबईमध्ये ३० हजार ५६५ बेड्सपैकी ५ हजार १०४ बेड्स सध्या वापरातत. आतापर्यंत मुंबईत ४६२ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई २० कंटेमेंट झोन आहेत. 

तर आज १ हजार २१८ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात ७१४ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के आहे. तर मुंबईत २० डिसेंबर २०२१ ते ४ जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईतील रुग्ण वाढ ही दुपटीने होत आहे. अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

https://twitter.com/mybmc/status/1478737731433885700?s=२०

मुंबईत कोविड लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटीचा टप्पा पूर्ण

कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम अंतर्गत, पात्र व्यक्तिंना मिळून 1 कोटी पहिल्या मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. मुंबईत आजवर कोविड लसीची पहिली आणि दुसरी अशा दोन्ही मात्रा मिळून सुमारे १ कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक लशी देण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/mybmc/status/1478727094930755589?s=२०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !

News Desk

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री म्हणतात…

News Desk

कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी पास वाटप

News Desk