HW News Marathi
Covid-19

मुंबईची चिंता वाढली! आज तब्बल ६ हजार ३४७ नवे कोरोना रुग्ण

मुंबई | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत आज (१ जानेवारी) २४ तासांत जवळपास ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाच मृत्यू झाला आहे. तर आज ४५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मुंबईत काल (३१ डिसेंबर) ५ हजार ६३१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, मुंबईत आता २२ हजार ३३४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र, निर्बंधात वाढ करणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. कोरोना निर्बधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे टोपेंनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. सध्या मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.२७ टक्क्यांवर गेला आहे. तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर आले आहे. आता कोरोना रुग्ण वाढ दुपटीने झाला आहे. 

https://twitter.com/ANI/status/1477264598277365761?s=२०

राजेश टोपे लॉकडाऊनसंदर्भात काय म्हटले

“कोरोना रुग्णांची वाढती संख्येमुळे लागणारे बेड आणि ऑक्सीजन यावर पुढील महत्त्वाचे निर्णय असल्याचे संकेत टोपेंनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. जरी कोण लॉकडाऊन बद्दल बोलत असेल तर आता लॉकडाऊचा विषयच नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती माध्यमांनी देखील खालू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल (३१ डिसेंबर) झालेल्या बैठकीत सध्या लॉकडाऊनसंदर्भाच चर्चा झालेली नाही. निर्बंध लावले पाहिजे, ज्या दिवशी ७०० मेटरिक टन ऑक्सीजनची मागणी होईल. त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होऊन जाईल, अशा पद्धतीने ठरविण्यात आलेल्याचे टोपेंनी सांगितले. त्यामुळे इतक्या लवकर लॉकडाऊचा विषय नाही. लॉकडाऊनचा परिणाम हा राज्याच्या अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो, त्यांच्यावर होतो. त्यामुळे लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ पाहिलेली आहे. लोकांची काळजी अधी घ्याची असल्याचे कालच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकी ठरले आहे. परंतु अशा पद्धतीचे कठोर निर्णय घेण्याची वेळे आली तर ते घ्याचे आहेतच. निर्बंध हा देखील त्यातला महत्त्वाचा भाग असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ

  • आज १ जानेवारी ६ हजार ३४७ 
  • ३१ डिसेंबर ५ हजार ४ २८
  • ३० डिसेंबर ३ हजार ६७१
  • २९ डिसेंबर २ हजार ५१०
  • २८ डिसेंबर १ हजार ३७७
  • २७  डिसेंबर ८०९
  • २६ डिसेंबर ९२२
  • २५ डिसेंबर ७५७
  • २४ डिसेंबर ६०२
  • २३ डिसेंबर ६०२
  • २२ डिसेंबर ४९० 
  • २१ डिसेंबर ३२७

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापूरात उद्या मराठा आरक्षण लढ्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक, संभाजीराजेही राहणार उपस्थित

News Desk

देशात करोनामुळे एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यु ! दुसरीकडे देशात रूग्णसंख्येत पुन्हा घट

News Desk

अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक, लॉकडाऊनने हे सिद्ध केले !

News Desk