HW News Marathi
Covid-19

गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोनामुक्त; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | गानसम्राज्ञी लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यता आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. “आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे लता मंगेशकर यांचे व्हेंटिलेट काढण्यात आले आहे. आता लता दीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांची देखरेखीत त्यांना ठेवण्यात आले आहेत,” अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. 

सध्या कोरोनावर ब्रेन इन्फेक्शनवर डॉक्टर उपचार करत  असून त्या डोळे उघडत आहेत आणि बोलतही आहेत. लता दीदी त्यांच्यात अशक्त असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे, अशी माहिती टोपेंनी दिली. लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरमीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करू घेतली. तेव्हा त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे कळाले. यानंतर लता मंगेशकरांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३४ हजार २८१ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ८९३ जणांनी कोरोना मुळे आपले प्राण गमवावे लागले. सध्या देशात १८ लाख ८४ हजार ९३७ वर येवून पोहोचली आहे. यानंतर आता देशात कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटींवर येवून पोहोचली आहे. तर सध्या देशातील दैनंदिन पॉझिटिव्ह रेट हा १४.५० टक्यांवर येऊन पोहोचला आहे. आता देशात ४ कोटी १० लाख ९२ हजार ५२२ सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आहे. तसेच देशात आतापर्यंत ४ लाख ९४ हजार ९१ लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

महाराष्ट्रात काल (२९ जानेवारी) २७ हजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ५० हजार १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ७२ लाख ९२ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन व्हेरियंटे ८५ रुग्णांची नोंद झाली असून यात सर्वाधिक ओमायक्रॉन रुग्णांची संख्या म्हणजे ४४ रुग्ण हे एकट्या पुणे शहरात नोंदविली आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३ हजार १२५ ऐवढी आहे. तर १ हजार ६७४ ओमायक्रॉन रुग्ण बरे झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात परवानगी, DGCI नं दिली आयातीसाठी मंजुरी!

News Desk

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

News Desk