HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१३ जानेवारी) दुपारी ४.३० वाजता देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या बैठकीत राज्यातील लसीकरणाचा वेग, केंद्राकडून लसीकरणासंदर्भात काही निर्देश देणार असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढवा घेऊन पुन्हा कठोर निर्बंध करण्याचे आदेश दिला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, करेळ आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगने वाढत आहे. तर देशातील १९ राज्यात १० हजारहून अधिक ओमायक्रॉन रुग्णांची संख्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी काल (१२ जानेवारी) दिली. तसेच पंतप्रधानांनी रविवारी (९ जानेवारी) झालेल्या  उच्च स्तरीय बैठकीत १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरण वेगाने करण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहेत. 

दरम्यान, या बैठकीत ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटिलेटर्सची संख्या, आयसीयू बेड्सची संख्या,ऑक्सिजन बेड्स. डॉक्टर आणि प्रत्येक राज्यातील लसीकरणाची सध्याची परिस्थिती यामुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे. देशातील दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या राज्यासाठी वेगळेवेगळे नियम लावण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

News Desk

मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी

News Desk

देशात २४ तासांत ४९,३१० रुग्ण आढळले, तर ७४० जणांचा झाला मृत्यू

News Desk