HW News Marathi
Covid-19

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम १४४ लागू; अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई

पुणे | कोरेगाव जवळील पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून २ जानेवारी २०२२ च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

या नियमानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी सोशल मीडियाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेशीत केलेले आहे.

दरवर्षी १ जानेवारीला आंबेडकर अनुयायी भीमा कोरेगाव येथील जयस्तंभाला वंदन करण्यासाठी पुण्यात येत असतात. मात्र, यंदा कोविड आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर येथे येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर अफवा पसरवणारा, द्वेष निर्माण करणारा तसेच दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर करण्यास बंदी असेल. शिवाय सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर लावण्यास देखील मनाई केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा हा पुणे दौरा म्हणजे फक्त दिखावा !

News Desk

महाराष्ट्रात प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच !

News Desk

पुणेकरांना दिलासा …पुण्यातला विकेंड लॅाकडाऊन अखेर रद्द !

News Desk