HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी घट

मुंबई | कोरोना रुग्णांच्या संख्येत मुंबईत घट पहायला मिळत आहे. गेल्यात २४ तासांत मुंबईत १ हजार ४११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात ११ जणांनी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत १६ हजार ६०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई सध्या १२ हजार १८७ सक्रिया कोरोना रुग्ण आहेत. तर २४ तासांत ३ हजार ५४७ जणांनी कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत सध्या १३ इमारती बीएमसीने सील केल्या आहेत. कोरोना वाढीचा दुप्पटीचा दर ३२२ दिवस इतका झाला आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.२१ टक्के इतका झाला.  

मुंबईत धारावीमध्ये काल (२८ जानेवारी)  शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर धारावीत २० कोरोनाच्या दुसऱ्या लाटते २० डिसेंबर २०२१ दिवस शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ३१ दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर गेली आहे. धारावी हा प्रचंड दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे धारावीत कोरोनाचा संर्सग रोखणे हे मोठे आव्हान आहे. धारावीनंतर दादरमध्ये आज (२९ जानेवारी) दिवसभरात ३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहिममध्ये १२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १५९१ रुग्णांना घरी सोडले, तर ६० हजार १४७ रुग्णांवर उपचार सुरू

News Desk

महाराष्ट्रातून मध्य प्रदेशला गेलेल्या ७ जणांना कोरोनाची लागण

News Desk

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ क्वारंटाईनमध्ये,पत्रकार परिषदेत होता कोरोना झालेला पत्रकार

Arati More