HW News Marathi
Covid-19

मुंबईकरांची चिंता वाढली, महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १० वर

मुंबई | मुंबईमध्ये २ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यामुळे आता राज्यातील ओमिक्रॉनची झालेल्या लोकांची संख्या १० वर आली आहे. परदेशातून आलेल्या १० प्रवाशांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. या १० प्रवाशांपैकी २ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर आता मुंबईची चिंता वाढली आहे.

यापूर्वी राज्यात मुंबईत २ ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉनचे ६ तर पुण्यात १ रुग्ण सापडला आहे. मुंबईजवळील कल्याण-डोंबिवलीत १ ओमिक्रॉनचा एक रुग्ण सापडला आहे. यामुळे आता एकूण १० ओमिक्रॉन रुग्णांची संख्या राज्यात झाली आहे.

दरम्यान, आठड्याभरात राज्यातील परिस्थिती पाहून राज्यात निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे १०० स्क्रिनिंग केले जात आहे. तसेच राज्यात जिनोमिक सिक्वेन्सिंग तपासणीच्या लॅब वाढवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनाही मिळणार खरीप कर्ज

News Desk

मुंबईमध्ये आठवडाभरात ५०० आयसीयू बेड्स नव्याने उपलब्ध होणार

News Desk

कलम ३७० हटवताना दाखवलेली हिंमत आता मराठा आरक्षणासाठी दाखवा !

News Desk