HW News Marathi
Covid-19

कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्यांच्या २ हजार ११६ वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत! – अमित देशमुख

लातूर। राज्य शासनाकडून कोविड-19 आजारामुळे दुर्देवाने मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना रुपये 50 हजार इतके सानुगृह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार जिल्ह्यात 3 हजार 495 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आजपर्यंत 2 हजार 116 इतक्या मयत व्यक्तींच्या वारसांच्या अर्जांना जिल्हा प्रशानाच्यावतीने मंजूरी देवून मदत निधी डी.बी.टी. द्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात राज्य शासनाकडून वितरीत करण्यात आल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमत्त जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर शुभेच्छा देतांना ते बोलत होते.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, खासदार सुधाकर श्रृगांरे, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यु पवार, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी आमदार पाशा पटेल, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, उपाध्यक्षा तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य समिती सभापती श्रीमती भारतबाई सोळंके, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी ( सामान्य) गणेश महाडिक, उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसीलदार स्वप्नील पवार सर्व शासकीय निमशासकीय विभाग प्रमुख, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री अमित देशमुख पुढे बोलतांना म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड – 19 मधील मयत झालेल्या 8 अनाथ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत 10 लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत 5 लाख मुदत ठेव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आलेली आहे. तसेच कोविड – 19 मुळे एक पालक गमावलेल्या 359 अनाथ बालकांना प्रति महिना रुपये अकराशे नुसार आतापर्यंत रुपये 19 लाख 57 हजार 700 इतके बाल संगोपन योजनेतंर्गत अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. तसेच 36 बालकांना शाळेची शुल्क माफीबाबतचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे, त्यापैकी 10 बालकांची शुल्क माफ झाली आहे, असेही सांगितले.

लातूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत काम करणारे डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ यांनी मोठ्या धैर्याने कोविड -19 च्या संसर्गावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असल्याचे सांगून जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 ने पॉझिटिव्ह संख्या 1 लाख 765 आहे, यापैकी 93 हजार 945 रुग्ण उपचार घेवून बरे झाले आहेत. दुर्देवाने 2 हजार 458 रुग्णांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात सद्याच्या परिस्थितीत 4 हजार 536 रुग्ण विविध शासकीय रुग्णालयात, कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोविड -19 ससंर्ग रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढतांना दिसत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत लातूर जिल्ह्यासाठी सन 2021-22 मध्ये फळबाग लागवडीकरिता 1 हजार 300 हेक्टर लक्षांक आहे. लक्षांकानुसार 3 हजार 871 हेक्टर क्षेत्रास 4 हजार 142 शेतकऱ्यांच्या प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीमध्ये 1 हजार 107 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबा, सिताफळ व पेरु या पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. मार्च -2022 अखेर लक्षांकाप्रमाणे लागवड पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात माहे जून ते ऑक्टोबर, 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पुर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून तूर्त 75 टक्के प्रमाणे 336.56 कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. या प्राप्त निधीपैकी आजपर्यंत 327.13 कोटी म्हणजेच 97.20 टक्के इतका निधी एकूण 5 लाख 7 हजार 499 बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना पीक पेरणीबाबतची माहिती भ्रमणध्वनी ॲपद्वारा उपलब्ध करुन देण्याकारिता ” ई – पीक ” कार्यक्रम 15 ऑगस्ट, 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील शेतीच्या खात्यांची एकूण संख्या 5 लाख 65 हजार 281 असून त्यापैकी 2 लाख 66 हजार 324 खातेदारांनी खरीप – 2021 हंगामात ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंद केल्याची माहिती दिली.

कृषीपंप वीज जोडणी धोरण- 2020 मध्ये ग्राहकांना वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यापर्यंत सुट देवून त्यांना वीज बिल कोरे करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. 31 मार्च, 2022 पूर्वी 66 टक्क्यापर्यंत सवलत घेवून ” वीज बील कोरे ” करण्याची ही शेवटची संधी आहे. या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे. वीज बीलाच्या वसूल झालेल्या रक्कमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापरता येणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी नमूद केले.

राज्यातील शेतकऱ्यास देशाच्या ” अमृत महोत्सव वर्षानिमित्त ” मोफत संगणकीकृत डिजीटल सातबारा वाटप मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील शेतीच्या खात्यांची संख्या 5 लाख 65 हजार 281 असून त्यापैकी 5 लाख 36 हजार 150 खातेदारांना सातबारा वाटप केलेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 94.85 टक्के मोफत सातबारा वाटप करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

लातूर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 10 ई.टी.एस. मशीन प्राप्त झालेल्या आहेत. या ई.टी.एस. मशीनच्या माध्यमातून ड्रोनद्वारे गावठणाचे सर्वेक्षण करण्याकामी 442 गावांची हद्द कायम करण्यास मदत झाली आहे. तसेच झाडाखालील मिळकत मोजणी कामी सुलभ झाले, आणि त्यामुळेच 180 गावांचे अधिकार अभिलेख तयार होण्याची प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यात आहे. ई. टी. एस. मशिन्समुळे तहसिलदार यांच्यामार्फत रस्ता खुला करण्यासंबंधी प्राप्त होणारे संदर्भ प्राधान्याने मार्गी लावणे यामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कोरोना कालावधीमध्ये जे कलाकार सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न या बाबीपासून वंचित राहीले होते. त्यांची अर्थिक कुचंबना होऊ नये, म्हणून पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून राज्यातील कलाकारांना कोरोना पार्श्वभुमीवर एकरकमी प्रति कलाकार रुपये 5 हजार अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र कलावंतानी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

सध्या जिल्ह्यात शिवभोजन केंद्राची संख्या 33 असून एकूण थाळींची संख्या 3 हजार 925 आहे. जिल्ह्यामध्ये दैनंदिन एका महिन्यात 1 लाख 17 हजार 750 तर वर्षभरात 14 लाख 13 हजार गरिब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरामध्ये थाळी वाटप करण्यात आली आहे. 15 एप्रिल, 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये संख्या 5 लाख 58 हजार 750 गरिब व गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळी निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील अधिकारी , कर्मचारी याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा आयुक्त अमन मित्तल, सहा. आयुक्त श्रीमती मंजुषा गुरमे, महानगरपालिकचे स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांचा महानगरपालिका लातूरतंर्गत स्वच्छ सर्वेक्षण -2021 च्या अनुषंगाने लातूर महानगरपालिकेस ODF+++ दर्जा GFC3-STAR मानांकन प्राप्त झाल्याबद्दल स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

महसूल विभागातंर्गत औरंगाबाद विभागातून उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून लातूर उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांना सन्मानपत्र तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांना कोव्हीड-19 काळात व अतिवृष्टीच्या कालावधीत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल सन्मानपत्र देवून पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

पोलीस विभागतंर्गत उल्लेखनिय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मा. राष्ट्रपती महोदयांचे पोलीस पदक मिळाल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजाजन भातलवंडे , उत्कृष्ट पध्दतीने गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल पोलीस स्टेशन शिवाजी नगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, 232 प्रकरणांमध्ये समोपदेशन करुन समेट घडवून संसार पूर्णवत केल्याबाबत नेमणूक – भरोसा सेल / महिला सहाय्य कक्षाचे पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मण चव्हाण, कोविड योध्दा म्हणून केलेल्या कामकाजाबद्दल नेमणूक – जिल्हा विशेष शाखेचे महिला पोलीस नाईक बक्कल नंबर 332 श्रीमती कल्पना जाधव व आधुनिक बेसिक प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक नेमणूक – पोलीस मुख्यालयाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल बक्कल नंबर 1510 श्रीमती दिपीका क्षिरसागर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार आला.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे कोविड -19 काळात उत्कृष्ट काम केल्याबाबत आयएमएचे अध्यक्ष / सचिव , आरएमओ डॉ. सतीश हरिदास , औषध निर्माण अधिकारी वहिद शेख यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे कोविड -19 काळात उत्कृष्ट काम केल्याबाबत लातूर जिल्हा लातूर केमिस्ट ॲन्ड ड्रगीस्ट असोशिएशनचे अध्यक्ष सचिव , मे. नाना गॅस इंडस्ट्रीज गचे व्यंकट फटाले, मे. विजय इंडस्ट्रीयल गॅसेसे प्रा. लि. चे विनोद गिल्डा, मे. शारदा गॅसेस प्रा. लि. चे आकाश मोरगे, औषध निरीक्षक सचिन बुगड यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातंर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतंर्गत सर्वात जास्त म्हणजे फळबाग 624 हेक्टर फळबाग लागवडीबाबत औसा तालुका कृषी अधिकारी एस. एस. ढाकणे, उत्कृष्ट देवणी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राहूल जाधव यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार नागनाथ पाटील यांना शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

समाज कल्याण कार्यालयातंर्गत तृतीयपंथी विशाल पोपटराव शिंदे, प्रिती माऊली लातूरकर, विष्णु नामदेव पोतदार, रोहीत सिध्दु धाकडे यांचा प्रमाणपत्र व ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातंर्गत बालकांचे पुनर्वसन करणारे केंद्र उमंग ऑटीझम सेंटर प्रशांत उटगे , वैश्विक ओळखपत्र देण्याबाबत अजमेरी समालोदीन मोमीन व बालाजी शिंदे यांना ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातंर्गत कायाकल्प कार्यक्रमातंर्गत लातूर जिल्ह्यात प्रथम पारितोषिक प्राथमिक आरोग्य केंद्र , जवळा ( बु) ता. लातूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.जी. भताने, लातूर जिल्ह्यात सर्वात जास्त लसीकरणाबाबत आरोग्य केंद्र गंगापूर ता. लातूर प्रा. वैद्यकीय अधिकारी डॉ. आय. सी. कोल्हे , सर्वाधिक कुटूंब नियोजन व नसबंदी शस्त्रक्रिया केल्याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र बोरोळ ता. देवणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग कलमबकर यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

भूमी अभिलेख कार्यालयातंर्गत ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबाबत लातूर उपअधीक्षक भूमी श्रीमती सिमा देशमुख यांना प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

6 हजार 783 रोपांची लागवड

नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साकारले …”फुलपाखरु उद्यान”

पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या “फुलपाखरु उद्यान” या उद्यानाचे क्षेत्रफळ 2677.57 स्क्वेअर मीटर असून 32 विविध प्रजातींच्या एकूण 6 हजार 783 रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या उद्यानाचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते काल करण्यात आले.

या उद्यानात येणाऱ्या पर्यंटकांना फुलपाखरांच्या जीवन चक्राबद्दल माहिती मिळावी या हेतूने माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहे. जगात 18 हजार प्रजातीची फुलपाखरे येथे असणार आहेत. यातील 1 हजार 500 फुलपाखरे भारतीय उपखंडात आढळतात. लातूर परिसरात आढळणाऱ्या 40 प्रजातींची नोंद घेवून त्यादृष्टीने फुलपाखरे आकर्षित करणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यासाठी “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त 14 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिकाधिक मजबूत व्हावी आणि येथील नागरिकांना आरोग्य सुविधा जलदगतीने मिळावी, या हेतूने जिल्ह्यासाठी “स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त” 14 नवीन रुग्णवाहिकांचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये लोकांनी ‘या’ गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

News Desk

राज्यात आज १३,१६५ नवे रुग्ण, तर ९,०११ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

सांगली जिल्ह्यात रिकव्हरी रेट वाढतोय – जयंत पाटील

News Desk