HW News Marathi
क्राइम

अवैद्य दारू विक्री करणा-यांवर कारवाई , चार आरोपी अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात स्थापलेल्या विशेष पोलीस पथकाने माहूर तालुक्यात दुस-यांदा धाडसी कारवाई केली असून यात अवैद्य दारु नेत असलेल्या चार आरोपींसह दारु,दुचाकी व चार चाकी वाहन अशा ६ लाख ६८ हजार रुपयाचा मुद्देमाल ८ जून च्या रात्री जप्त केला आहे. या विशेष पथकाने सुरु ठेवलेल्या धडक कारवाईत अवैद्य दारु,गुटखा,मटका,रेती तस्करांचे धाबे दणानले असून गेल्या १० दिवसापासून विशेष पथकांच्या धाडसत्रात ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ गुन्हे दाखल झाली व यात ६१ आरोपीना ताब्यात घेऊन ०१ कोटी १२ लाख ६१ हजार ९७२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ८ जून २०१७ च्या रात्री माहूर तालुक्यात दुस-यांदा कारवाई केली आहे. गस्तीवर असलेल्या पथकातील सहाय्यक पो.नि.ओमकांत चिंचोलकर, पोकॉ. लाठकर, जगताप, कंधारे, पायनापल्ले, नीरने, कुलकर्णी, अवतारीक, चालक निर्मलसिंग सिंधू हे रात्री ९:०० वाजताच्या दरम्यान ईवलेश्वर रस्त्यावर थांबले असतांना समोरून सिल्व्हर रंगाची टी.व्ही.एस. दुचाकी येतांना दिसली.त्यावरी स्वारास अडऊन चाैकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रफुल रुपसिंग जाधव (२३) आहे व माझ्या माघे लाल रंगाचे चारचाकी वाहन क्र. एम एच ०२ ए. एल. २३४७ हे येत आहे.या तवेरा जीप मध्ये देशी दारू आहे ती पोचविण्यासाठी मी रस्ता दाखवीत असल्याचे त्याने सांगितले. सादर जीप तपासणी केली असता त्यात निलेश मनोज जयस्वाल (२६), अर्जुन दत्ताराम राठोड (२१), बाळू मोहन राठोड (१९) सर्व रा.ईवळेश्वर हे मिळाले व देशी दारू संत्रा संजीवनी कंपनीच्या १८० एम. एल.च्या २८८ बॉटल्स बॉक्स मध्ये ठेवलेल्या मिळाल्या. अंदाजित २८ हजार ८०० रुपयांची दारु , ६ लाखाची तवेरा गाडी, ४० हजाराची दुचाकी असा ६ लाख ६८ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरचा माल विनापरवाना बेकायदेशीररीत्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचा पंचनामा करून जागीच लोकमोहर सील करून त्यांच्यावर मुंबई प्रोव्हेशनल कायदा कलम ६५ (ई) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री अपरात्री सतत होत असलेल्या या पथकाच्या धाडसी कारवाने शांतता प्रिय नागरीकांतून समाधान व्यक्त होत असून अवैद्य धंदेवाल्यांचे धाबे दणानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भोकरमध्ये ६७ हजाराची अवैध देशी दारु  जप्त

News Desk

आर्थर रोडजेलमध्ये कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

News Desk

सीबीआयकडून चंदा कोचर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

News Desk