HW News Marathi
क्राइम

आत्महत्ये ऐवजी आईची हत्या

मुंबई पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर गनोरे यांच्या पत्निची हत्या केल्याची कबूली मुलगा सिध्दांत यांनी दिली आहे. सिध्दांतला पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टांने 2 जुनपर्यंत पोलिस कोटडी सुनावली आहे. पोलिसांनी सिध्दांतची चौकशी केली असता.आईच्या सततच्या कटकटीला कंटळून स्वत:च आत्महत्या करणार होता मात्र अचनाक विचार बदलला आणि स्वत:च्या जागी आईची हत्या केली.अशी धक्कादायक माहिती सिध्दांतने कबुली दिली.

सांताक्रुजच्या प्रभात कॉलनीत राहणाऱ्या गणोरे कुटुंबात सतत भांडणे होत होती. ज्ञानेश्वर गणोरे हे पोलीस खात्यात असल्याने ते घरी जास्त वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळेच त्यांच्या घरी नेहमीच वाद होत असत. त्यांची पत्नी दीपाली गणोरे ही सतत तिला वेळ न दिल्याने त्यांच्याशी भांडत असे, तसेच त्यांच्यावर संशय देखील घेत असे. घरात सतत होणाऱ्या भांडणाचा परिणाम हा शेवटी त्यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर देखील झाला. 10 वीमध्ये 92 टक्के गुण मिळवणारा सिद्धांत इंजिनिअरिंगला घातल्यावर नापास होऊ लागला. इंजिनिअरिंगमध्ये सतत तीन वर्ष नापास झाल्यावर त्याला आईने सायन्सला घातले. पण तिथे देखील काही वेगळे झाले नाही. यावर्षी झालेल्या वार्षिक परीक्षेला सिद्धांत बसलाच नाही. आईच्या त्रासाला सिद्धांत अाधीच कंटाळला होता. त्यात त्याचे कुणीच मित्र नसल्याने तो घरीच एकटाच असे. त्यात आईच्या अशा वागण्याने त्याचे मानसिक संतुलन देखील बिघडण्यास सुरुवात झाली होती. दिवसांपूर्वीच सिद्धांतचा एफवाय बीएससीचा निकाल लागला होता. परीक्षेला न बसलेल्या सिद्धांतला आपला निकाल माहीत होताच. त्यात त्याची आई त्याच्यासोबत रिझल्ट घेण्यासाठी येणार असल्याने त्याची धाकधूक वाढली होती. सुरुवातीचे काही दिवस त्याने आईला टाळले. मात्र 23 तारखेचा दिवस आला आणि त्याची धाकधूक अधिकच वाढली. आई रिझल्टला येणार म्हणून सिद्धांत तणावात होताच. यामुळे आत्महत्या करण्यासाठी त्याने चाकू देखील हातात घेतला. पण तितक्यात पुन्हा त्याला आई काहीतरी कारणावरून ओरडली. या गोष्टीचा त्याला राग आला. आपण का मरायचे? असे त्याला वाटू लागले आणि त्याने स्वतःला मारण्यासाठी घेतलेल्या चाकूने आईच्या गळ्यावर तब्बल 9 वार केले. तिची हत्या केल्यानंतर तिच्याच रक्ताने एक नोट लिहिली. tiered of her catch me and hang me आणि पुढे एक स्माइली देखील काढली. त्यानंतर त्याने आंघोळ केली आणि कपडे बदलून घरातील 2 लाख रुपये घेऊन बाहेर पडला.

 

S
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औषध देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर भोंदू बाबाचा बलात्कार

News Desk

अनिल देशमुखांच्या जावयाला अटक!

News Desk

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

News Desk