HW News Marathi
क्राइम

आयएएस अधिकारी लाच घेताना रंगे हात अटक

मुंबई : पालघर जिल्हा आश्रमशाळेतील मुख्य अधीक्षकाकडून (१२ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद भगवान गवादे (५४) व उपआयुक्त किरण माळी (३९) एसीबीने शनिवारी सायंकाळी अटक केली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कार्यालयात आंब्याच्या पेटीतून ही रक्कम स्वीकारताना एसीबी पथकाने त्यांना पकडले. पालघर जिल्ह्यातील १२ आश्रमशाळांमधील अधीक्षकांना काही महिन्यांपूर्वी ‘रेक्टर’ म्हणून पदोन्नती मिळाली आहे. मिलिंद गवादे याने त्या सर्वांकडे प्रत्येकी एक लाख याप्रमाणे १२ लाख रुपये मागितले होते. पैशाची पूर्तता न केल्यास त्यांची पदोन्नती शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर रद्द करून पुन्हा अधीक्षक या पदावर नेमणूक करू, असे धमकाविले होते. यासंदर्भात आलेल्या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचून गवादे व किरण माळी यांना अटक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अपहरण झाल्याचा बनाव, स्वत: अल्पवयीन मुलीने भावाच्या मदतीने रचल्याचे उघड

swarit

दलित तरुणीवर अत्याचार, काकूने बनवला व्हिडीओ

News Desk

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

News Desk
क्राइम

उल्हासनगरच्या धुरू बारवर छापा

News Desk

उल्हासनगरच्या धुरू बारवर छापाबारबाला, वेटर्स, ग्राहक अशा ७५ जणांना अटक

उल्हासनगरच्या भर वस्तीत असलेल्या धुरू बारवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी धाड टाकली. यावेळी बारमध्ये खुलेआमपणे बीभत्स नृत्य सुरू होतं. पोलिसांनी या बारमधून एकूण ७५ जणांना अटक केलीये.

सरकारने डान्सबार बंद केल्यानंतर मागील वर्षी न्यायालयाच्या परवानगीनं काही अटी घालून डान्सबार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या अटी न पाळताच उल्हासनगरात कॅम्प २ भागातल्या नेहरू चौकात धुरू हा डान्सबार डान्सबार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास ठाणे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी धुरू बारवर धाड टाकली. यावेळी तोकड्या कपड्यांमध्ये १५ बारबाला आणि २ तृतीयपंथी ग्राहकांमध्ये बिभत्स नृत्य करत असल्याचं आढळलं. त्यामुळं पोलिसांनी या बारबाला आणि तृतीयपंथियांसह बारचा मॅनेजर, कॅशियर, वेटर्स आणि ग्राहक अशा एकूण ७५ जणांना अटक केलीये. या सर्वांना शनिवारी उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.

Related posts

पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे – पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज

News Desk

पोलिसांमुळे महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न फसला

News Desk

25 हजारांची लाच घेताना कोतवाल व तलाठी अडकले एसीबीच्या जाळ्यात

Manasi Devkar