उत्तम बाबळे नांदेड :- कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण सायमोते यांच्या भ्रष्ट कारभाराला अनेक लाभार्थी व विविध विकास कामांचे कंत्राटदार जाम वैतागले होते.अशाच एका वैतागलेल्या कंत्राटदाराकडून संरक्षक भिंतीच्या कामाचे देयक काढण्यासाठी १५०० रुपयाची लाच घेतांना १८ मे रोजी रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ,( एसीबी ) नांदेड च्या पथकाने पंचायत समिती कार्यालयात रंगेहात पकडले असून त्यांच्या विरोधातील कार्यवाही रात्री सुरु आहे. सविस्तर असे की ,कंधार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण सायमोते हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध विकास कामांचे देयके काढण्यासाठी लाभार्थी व कंत्राटदार यांच्याकडू मिळेल तेलढी रक्कम काढत होते.आणि ती दिल्याशिवाय देयके काढत नव्हते.अशातच १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हाळदा ता.कंधार तांडा येथील जंगदबा माता मंदिराच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम पुर्ण झाल्याने या कामाचे देयक गटविकास अधिकारी किरण सायमोते यांनी त्या कामाशी संबंधीत असलेल्या राक्षसमारे यांना दोन हजार (२०००/-रु) रुपयाची मागणी केली होती.ती रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले व ही बाब गावक-यांना त्या संबंधीताने सांगीतली. मंदीराच्या कामातही हा अधिकारी लाच मागतो म्हणून गावक-यांचा राग अनावर झाला व त्यांनी याबाबद लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,( एसीबी ) कार्यालय नांदेड येथे रितसर तक्रार दिली.या तक्रारीची शहानिशा पंचासमक्ष या विभागातील अधिका-यांनी केली व ठरल्या प्रमाणे ती रक्कम किरण सायमोते यांना १८ मे २०१७ रोजी देण्याचे ठरले. ती रक्कम घेण्यासाठी किरण सायमोते हे कार्यालयीन कामकाजाची वेळ संपली होती तरी देखील रात्री उशीरा पर्यंत पंचायत समिती कार्यालयातील त्यांच्या कक्षात वाट पाहत बसले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग,नांदेड (एसीबी) चे पोलीस अधिक्षक संजय लाठकर, परिक्षेत्र उप अधिक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी माणिक बेंद्रे,पो.नि.अशोक गित्ते,जमादार शेख चाँद,अमरजितसिंह चौधरी,गणेश तालकोकुलवार,पो.ना.चालक अनिल कदम यांसह आदी जणांच्या पथकाने पं.स.कार्यालयात साफळा रचला आणि १५००/- रुपयाची लाच स्विकारतांना गटविकास अधिकारी किरण सुभाष सायमोते यांना रंगेहात पकडले. सदरील कार्यवाहीमुळे या भ्रष्ट अधिका-यास वैतागलेल्या लाभार्थी मधून समाधान व्यक्त होत असून ही बातमी लिहीत असतांना रात्री उशीरा पर्यंतही लाच लुचपत प्रतिबंधक कायदा ७,१३ (ड) (१) व १३ (२) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे गटविकास अधिकारी किरण सुभाष सायमोते ,गटविकास अधिकारी पं.स.कंधार जि.नांदेड ,मूळ गाव रा.मिरज जि.सांगली यांच्या विरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.