HW News Marathi
क्राइम

गळफास घेवून तरुण शेतक-याची आत्महत्या

उत्तम बाबळे

भोकर :- तालुक्यातील मौ.गारगोटवाडी येथिल एका शेतकऱ्याने सततची नापीकी व बँकेचे कर्ज परत फेडीच्या विवंचेने चिंताग्रस्त होऊन झाडाळा गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या तरुण शेतक-याच्या आत्महत्तेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भोकर तालुक्यातील मौ. गारगोटवाडी (दिवशी) येथील गणेश मारोती जाधव (३५) या शेतकऱ्याने गेल्या चार वर्षा पासून होत असलेल्या सततच्या नापीकीला कंटाळून व बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेने त्रस्त होऊन दि.६फेब्रुवारी २०१७ ,सोमवार रोजी दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान गावाजवळील शिवारात एका उंबराच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शेताकडे जाऊन येतो म्हणुन घरुन गेलेला हा शेतकरी ब-याच वेळानेही घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता त्याने हे अघटीत केल्याचे निदर्याशनास आले.या घटने बाबत मयत शेतक-याचा मोठा भाऊ रावसाहेब जाधव यांनी भोकर पोलीसांत दिलेल्या माहीती वरुन आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पो.जमादार सुदाम ठाकरे हे पुढिल तपास करीत आहेत.तर या तरुण शेतक-याच्या आत्महत्तेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलीची गळा चिरून हत्या

News Desk

दौंडमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

swarit

कोल्हापूर कार व्यापाऱ्यावर गोळीबार

News Desk