HW News Marathi
क्राइम

जॅक निसटून ट्रक अंगावरुन गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकर तालुक्यातील सिताखांडी घाटात नादुरुस्त ट्रक खाली जाऊन झालेली बिघाड शोधतांना तो बंद ट्रक चालकाचा अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून रात्री उशीरा पर्यंतही या अपघात प्रकरणी भोकर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. राजस्थान येथून मार्बल फरशी घेऊन आंध्र प्रदेशात जात असलेला ट्रक क्र.ए.पी.१६ टी.ई.२२९९ हा १७ मे २०१७ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान भोकर तालुक्यातील सिताखांडी घाटात आला असता तो घाट चढून आर.टी.ओ.कावळे यांच्या शेताजवळ बंद पडला.ट्रक क्लिनरच्या ( सहाय्यक चालक ) प्राथमिक अंदाजानूसार घाटातील चढ चढून आल्याने इंजिनला होणार डिझेल पुरवठा बंद होऊन एअर ब्रेकप झाले व ट्रक बंद पडला असावा.हा दोष शोधण्याच्या व डिझेल पंपमधील एअर काढण्याच्या उद्देशाने ट्रक चालक ब्रम्हेश्वर व्यंकटेश्वर ( ३८ ) रा.कंचिन चेरला,वार्ड क्र.१०,ता.नेरीग्राम जि.कृष्णा (आंध्र प्रदेश ) हा इंजिन कॅबिन मधून उतरत असतांना त्याने क्लिनरला ट्रकच्या चाकाखाली दगड लाव असे सांगीतले.परंतू क्लिनरला त्यावेळी दगड उपलब्ध न झाल्याने त्याने चाकाखाली जॅक लावला.यावेळी चालकाने ट्रकखाली जाऊन बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला असता हा ट्रक उतारावर व त्यात भरपुर ओझे असल्यामुळे माघे घसरला.चाकाखाली लावलेले जॅक निसटले व तो ट्रक क्षणातच माघच्या दिशेने वेगाने घसरत चालकाच्या अंगावरुन गेला व यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हे समजल्यावरुन भोकर पोलीस ठाण्याचे जमादार उमेश कारामुंगे व पो.ना.संजय कंधारे हे घटनास्थळी गेले आणि त्यांनी काही नागरीकांच्या मदतीने चालकाचा मृतदेह ट्रक खालून बाहेर काढला.ट्रकच्या क्लिनरने ( सहाय्यक चालक ) याच दरम्यान घटनास्थळावरुन घटनास्थळावरु पळ काढल्याने व रात्रीची वेळ असल्याने शव विच्छेदन झाले नाही. तसेच या अपघात प्रकरणी कसलीही फिर्याद कोणीही दिलेली नाही.फिर्यादी अभावी रात्री उशीरा पर्यंतही गुन्हा दाखल करण्यात आला नसून ट्रक मधील उपलब्ध कागदपत्रावरुन मिळालेल्या माहिती आधारे पोलीसांनी ट्रक मालकास याबाबद कळविले आहे.सकाळ पर्यंत संबंधीत लोक येणार आहेत व ते आल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येईल असे जमादार उमेश कारामुंगे यांनी सांगीतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री कृतिका चौधरी हिच्या हत्येचा तपास करण्यात एक महिन्यानंतर पोलिसांना यश

News Desk

सहा वर्षाच्या मुलीसोबत छेडछाड

News Desk

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर

Aprna