HW News Marathi
क्राइम

दोन गटात एकमेकांवर प्राणघातक हल्ला: ३ जखमी

 

गौतम वाघ

उल्हासनगर: उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हददीत शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये एकमेकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तीनजण जखमी झाले असून दोन गटानी एकमेकांविरोधात केल्या तक्रारीत २७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प नं. १ येथील गोलमैदान परिसरातील साधू वासवाणी पुतळया समोर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गुरूदिप उर्फ बॉक्सर लभाना हा सुरेंद्रसिंग लभाना याच्यासोबत अ‍ॅक्टीव्हा मोटरसायकलवरून घरी जात होते. त्यावेळी मोटरसायकलवरून घरी आलेल्या २० ते २१ जणांच्या टोळीने त्याला अडवले. अज्जु नावाच्या तरूणाने त्याच्या जवळील रिव्हॉलवर काढून गुरूदिप याच्या पोटाला लावून त्याच्याकडील १० हजाराची रोख रक्कम व गळयातील सोन्याची चैन काढून घेतली. त्यानंतर त्या सर्वांनी त्यांच्या जवळील चॉपर, तलवार, गुप्ती व चाकूने गुरूदिप उर्फ बॉक्सर याला जीवेठार मारण्याचा उददेशाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. बॉक्सर याला वाचवण्याचा प्रयत्न करणा-या सुरेंद्रसिंग यालाही ठोशाबुक्क्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुरेंद्रसिंग याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्जु व त्याच्या २० साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूदिप उर्फ बॉक्सर याला श्रध्दा हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. दुस-या घटनेत सैफ सैयद (२०) हा गोलमैदानाच्या प्रवेशव्दारा जवळून मोटरसायकलवरून उल्हासनगर रेल्वे स्टेशनकडे जात असताना बॉक्सर याने त्याच्या मोटरसायकलला धडक मारली. त्यावेळी त्यांच्यात बोलाचाली झाली. बॉक्सर याच्यासोबत असलेल्या त्याच्या सहका-यांनी सैफ याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली. सैफ याचे मित्र अज्जु व अस्लम हे त्याला वाचवण्यासाठी त्याठिकाणी आले असता बॉक्सर याने त्याच्या जवळील धारधार चाकूने अस्लम व अज्जू या दोघांवर वार केले. व इतरांनी सैफ व जखमी अज्जु, अस्लम यांना पकडून ठेवून बॉक्सरने सैफ याच्या गळयातील सोन्याची चैन खिशातील २० हजाराची रोख रक्कम हिसकावून काढून घेतली अशी तक्रार उल्हासनगर पोलीस ठाण्यात बॉक्सर व त्याच्या ५ सहका-यांविरोधात दाखल करण्यात आली आहे. जखमी अज्जु व अस्लम हे दोघेही श्रीदेवी हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट आहेत. दोन्ही गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी तीनजण जखमी झाले असून २७ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अहिरे करित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये तुफान हाणामारी

News Desk