HW News Marathi
क्राइम

धर्माबादमध्ये दगडाने ठेचून हत्या करणा-याला 24 तासात अटक

उत्तम बाबळे

नांदेड :- धर्माबाद तालुक्यातील येताळा येथे विवाहीत महिलेचा दगडाने ठेचून व गळा आवळून खून केल्याप्रकरणी धर्माबाद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.यशवंत लक्ष्मण धडेकर( ४८) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी येताळा येथील रहिवाशी असून तो मिस्त्री काम करत होता. पोलिसांनी आरोपीला 28 मे रोजी कोर्टात हजर केले असता कोर्टाने 31 मे पर्यंत पोलिस कोटडी सुनावली आहे.

धर्माबाद तालुक्यातील अतकूर ते येताळा गावाकडे जाणा-या रस्त्यावर एका अनोळखी विवाहित महिलेचा दगडाने ठेचून व टावेलने गळा आवळून अमानुशपणे खून करुन फेकलेला मृतदेह २७ मे २०१७ रोजी सकाळी सापडला होता. हे समजताच धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील,पोलीस निरीक्षक अंगद सुडके,बिट जमादार शेख रसूल यांच्यासह आदी पोलीस अधिकारी कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला. विवाहित महिलेचा चेहरा दगडा ठेचल्यामुळे विद्रुप झाला होता.त्यामुळे प्रथम ओळख पटविणे अवघड होते.घटनास्थळी काही पुरावे सापडले होते ते तपासण्यासाठी व मारेक-याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट्स आदींना पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाचे पो. उप.नि. मिलींद कुलकर्णी, पो.हे.कॉ.अयुब म.जाफर, चालक अब्दुल गणी व ब्राऊनी नावाचा डॉग आणि फिगंरप्रिंट्स विभागाचे विशाल गोडबोले, के.बी.जोंधळे , भुरे यांनी कसून शोध घेतला.अवघ्या काही तासात धर्माबाद पोलीसांना त्या मयत महिलेची ओळख पटविण्यात यश आले.त्यानूसार तिचे नाव शांताबाई अशोक मिसलु(४०) रा.मेट्राजपल्ली,मंडल – डिचपल्ली ,जिल्हा निजामाबाद (तेलंगणा)ह.मु.रत्नाळी ता.धर्माबाद जि.नांदेड. असे असून ती काही प्रासंगीक कार्यक्रमासाठी काही दिवसापुर्वी माहेरी रत्नाळी येथे आली होती.तिची ओळख पटल्यानंतर तिच्या पतीस याबाबद माहिती कळविण्यात आले.त्यावरुन पती अशोक बोमय्या मिसलु (४५) रा.मेट्राजपल्ली,मंडल -डिचपल्ली ,जिल्हा निजामाबाद (तेलंगणा) यांनी २७ मे रोजी धर्माबाद पोलीसात त्याच्या पत्नीची अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याची फिर्याद दिल्यावरुन सायंकाळी ५:०० वाजता त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील,पो.नि.अंगद सुडके व पोलीस कर्मचा-यांनी त्या अज्ञात मारेक-याच्या शोधार्थ तपासचक्र गतीमान कले आणि अवघ्या काही तासात मारेक-यास शोधण्यात त्यांना यश आले. पुढील तपास पो.नि.अंगद सुडके व करमचारी करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात भामट्याने थाटले चक्क एसीबीचे बोगस कार्यालय

News Desk

माहुरमध्ये १३ लाख रूपये किमतीचे गुटखा जप्त   

News Desk

राजस्थानमध्ये मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ४५ जण जखमी

News Desk