HW News Marathi
क्राइम

पाच हजार कैद्यांची होणार सुटका

मुंबई: राज्यातील जेलमधील कैद्यांच्या वाढत्या कैद्यांच्या संख्येने जेलप्रशासनाची डोकेदुखी वाढली असून जेलमध्ये जागा नसल्याने किरकोळ गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या ५ हजार कैद्यांची सुटका करण्याची निर्णय घेण्यात आला.

राज्यातील जेलमधील विचाराधीन कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) एस. के. श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य सचिव (जेल) श्रीकांत सिंह, एडीजीपी (जेल) बी. के. उपाध्याय, एडीजीपी प्रभात कुमार आणि एसीपी ए. जयकुमार उपस्थित होते. राज्यातील जेलमध्ये जवळपास २९ हजार कैदी असून २४ हजार कैद्यांत ५ हजार कैद्यांवर गंभीर गुन्हे नाहीत, त्यामुळे त्यांची सुटका केली जाऊ शकते, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यात ७०० विचाराधीन कैदी असून ते खूपच गरीब आहेत. या कैद्यांना जामीन मिळालाय परंतु त्यांच्याकडे जामीन करण्यासाठी पैसे नसल्याने ते जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. या अशा कैद्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी पैशांची व्यवस्था करावी, असे आदेश राज्य सरकारने पोलिसाला दिले आहेत. जेलमधील गंभीर गुन्हे नसलेल्या कैद्यांची सुटका करण्यास राज्य सरकारने सांगितले असून ज्या जेलमध्ये जास्तीचे कैदी आहेत त्यांची लवकरच सुटका होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी उपचारा दरम्यान रुग्णालयातून पळाला

News Desk

विरोध असताना मुलीचे लग्न लावले, सहा महिन्यांनी केला जावयचा खून

News Desk

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा….

News Desk