HW News Marathi
क्राइम

पुणे सोलापूर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

एकाच दिवशी विविध अपघातांत 15 जणांचा मृत्यू…..

पुणे – सोलापूर महामार्ग मृत्यूचा सापळा

सोलापुर – पुणे- सोलापूर महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनलाय

या महामार्गावर दररोज कुठे न कुठे अपघात घडत असून काल शनिवारी एकाच दिवसात वेगवेगळ्या अपघातांमध्ये 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय..

शनिवारी पहाटे उरुळी कांचन येथे ट्रक आणि मिनीबसचा अपघात होऊन 11 जण ठार झाले होते त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पाटसच्या उड्डाण पुलावर दुचाकीवर असणाऱ्या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 2 जण जागीच ठार झाले. तर याच महामार्गावरील इंदापूर जवळ रात्रीच्या सुमारास बोलेरो जीप आणि दुचाकीचा अपघात होऊन पुन्हा 2 जणांना आपला जीव गमवावा लागला.

एकाच दिवसात एकाच महामार्गावर पन्नास किमीच्या अंतरावर झालेल्या या विविध अपघातांमुळे 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून हा महामार्ग सहा पदरी असूनही दररोज या महामार्गावर कुठे न कुठे भीषण अपघात होऊन निष्पापांचा बळी जात आहे…

त्यामुळे हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असा प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मातंग समाजाच्या मयत दफनविधीला गावक-यांचा विरोध, पोलीस बंदोबस्तात झाला दफनविधी

News Desk

मुलीची हत्या प्रकऱणी बापाला फाशी

News Desk

मुलाला घेवून आई बेपत्ता

News Desk
देश / विदेश

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेचे सर्वोच न्यायालयाचे आदेश 

News Desk

 

  • भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना

अक्षय कदम/ वृत्तसंस्था

नवी दिल्ली – आज सुप्रीम कोर्टाने एक अभूतपूर्व निकाल दिला, कोलकाता उच्च न्यायालयाचे विदयमान न्यायाधीश सी एस कर्णन यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामिनपात्र गुन्हा दाखल केला असून 31 मार्चपूर्वी हजर राहण्याचे आदेश दिले.

भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील ही पहिली घटना म्हणावी लागेल जिथे चक्क उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवरच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहार यांच्या अध्यक्षतेखालील सात न्यायाधीशांच्या पीठाने कर्णन यांच्याअनुपस्थितीत विरोधात पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून कर्णन यांना 31 मार्च रोजी सुप्रिम कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सात सदस्यीय पीठाने मुख्य न्यायाधीशांसोबत 15 मिनिटे चर्चा करून पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला. कर्णन यांनी संबंधित न्यायाधीशांबाबत केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. यासंदर्भात कर्णन यांनी फॅक्स केलेले पत्र त्यांची बाजू म्हणून ग्राह्य धरण्यास नकार देण्यात आला असून कर्णन यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, न्यायाधीश कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला असल्याने त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.

Related posts

भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड

News Desk

आपल्या जवानांना निशस्त्र कोणी पाठवले ? ह्याला जबाबदार कोण ?

News Desk

सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणात पदार्पण, लवकरच पक्ष स्थापन करणार!

News Desk