HW News Marathi
क्राइम

माया शेळके आत्महत्या प्रकरणी भिम टायगर सेना संस्थापकास अटक

दुसरी पत्नी गायीका अंजली भारती विरुद्ध ही गुन्हा दाखल

उत्तम बाबळे

नांदेड : – भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर ऊर्फ दादासाहेब शेळके यांनी व त्यांची दुसरी पत्नी गायीका अंजली भारती (नागपूर) यांनी मिळून वेळोवेळी पहिली धर्मपत्नी माया शंकर शेळके हिचा शारिरीक व मानसीक छळ करुन जबर मारहाण करुन सतत त्रास दिला.हा त्रास असह्य झाल्यामुळे दि. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी तिने अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात गंभीररित्या ती भाजली गेल्याने ऊपचारा दरम्यान तिचा १७ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणां विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून शंकर ऊर्फ दादासाहेब शेळके यांना आज दि.१८ फेब्रुवारी रोजी नांदेड पोलीसांनी अटक केली व पुढील तपासासाठी हदगांव पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

आंबेडकरी चळवळीतील तरुण व दलीतांची आक्रमक संघटना म्हणून प्रसिद्धीस आलेल्या भिम टायगर सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर ऊर्फ दादासाहेब शेळके यांनी आपली पहिली धर्मपत्नी जिवंत असतांना भिम गितांच्या अनेक कार्गायक्रमांतून गायकीच्या विविध कार्यक्रमांतून नव्यानेच सुपरिचीत झालेल्या गायीका अंजली भारती (नागपूर) हिच्याशी सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातुन संपर्क वाढऊन जवळीकता साधत सुत जुळवून तिच्याशी दुसरा विवाह केला. त्यामुळे लग्नाच्या पहिल्या पत्नी सोबत दुरावा निर्माण झाला. यातूनच दोघी सवतीमध्ये मतभेद निर्माण झाले व वाद होऊ लागला.दरम्यान शंकर शेळके यांनी दुसरी पत्नी गायीका अंजली भारती सोबत मिळून डोरली येथे येवून पहिली पत्नी माया शेळके हिला शारिरीक व मानसीक त्रास देणे सुरु केले. कांही वेळा तर त्यांनी जबर मारहाणही केली. त्यामुळे या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून माया शेळके यांनी १६ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्री दरम्यान राहते घरी माै.डोरली ता.हदगाव येथे अंगावर रॉकेल ओतून घेवून स्वत:ला जाळून घेतले.माया शेळके हिने जाळून घेतल्यानंतर तिला जळालेल्या अवस्थेत हदगांव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले होते. परंतू ती ९० टक्के गंभीररित्या भाजली गेल्यामुळे अधीक ऊपचारार्थ तिची रवानगी नांदेड येथे करण्यात आली. नांदेड येथील कै. शंकरराव चव्हाण मेमोरीयल हॉस्पीटल मध्ये तिच्यावर उपचार करण्यात येत होते.परंतू दुर्दैवाने उपचारा दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी तिचा मृत्त्यु झाला. मयत माया शेळकेच्या वडिलांनी उपरोक्दित आशयानुसार पोलिसांत फिर्याद दिली.तसेत दिलेल्या त्या फिर्यादित शंकर शेळके यांचा भाऊ नारायण शेळके यांने मयत माया शेळके हिच्यावर वाईट नजर ठेवून विनयभंग ही केला होता व त्याची पत्नी देखील या छळात सहभागी असल्याचे नमुद केले आहे.१८ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदनानंतर मयत माया शेळकेते पार्थीव अंत्यविधीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रक्रियेचा प्रयत्न पोलिसांनी केला.परंतु माझ्या मुलीच्या मृत्युस कारणीभुत असणा-या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केल्याशिवाय तिचे शव ताब्यात घेणार नाही असा पावित्रा फिर्यादी वडिलांनी घेतला.फिर्यादी वडील व मयत माया शेळके हिच्या माहेर कडील नातेवाईकांनी ही भुमिका घेतल्यामुळे नांदेड पोलीसांनी शंकर उर्फ दादासाहेब शेळके यास दि.१८ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे अटक केली.तसेच अधिक तपासासाठी नांदेड पोलिसांनी त्याला हदगांव पोलीसांच्या ताब्यात दिले. शंकर ऊर्फ दादासाहेब शेळके यांच्यासह दुसरी पत्नी गायीका अंजली भारती, भाऊ नारायण शेळके, व भावाची पत्नी ऊषा शेळके यांच्या विरुद्ध कलम ४९८(अ), ४९४, ३५४(अ) ५०४, ५०६, ३०६, व ३४ भादवी अन्वये शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हदगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पोलिस उप.नि. दत्तात्रय वाघमारे हे करीत आहेत. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून शंकर शेळके व भिम गितांच्या माध्यमातून गायीका अंजली भारती हे प्रबोधन करायचे.परंतु त्यांच्या हातुन हा गुन्हा घडला व एक निष्पाप महिला मृत्युमूखी पडली.ही बाब निंदनिय असल्याने ….” लोकां सांगे ब्रम्हद्न्यान नी आपण मात्र कोरडे पाषाण ! ” या म्हणी प्रमाणे उपरोक्त पती पत्नी विषयी परिसरात चर्चा होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोळीबार करुन पकडला, फरार आरोपी

News Desk

बायपास सर्जरीनंतर सचिन वाझेनी 3 महिने घरात नजरबंद ठेवण्याची केली मागणी

News Desk

दोघांच्या डोळ्यात मिरची,अं,गावर पेट्रोल टाकून दरोडेखोरांनी १ लाख २३ हजार रुपये लुटले

News Desk