HW News Marathi
क्राइम

बसवर फेकला पेटता गोळा

धुळेः कुख्यात गुंड गुड्ड्याच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मारेकरी अद्याप फरार आहेत. मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. दुसरीकडे, शुक्रवारी गुडड्‍याचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी एसटी बसवर पेटता गोळा फेकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे.

गुड्ड्याचा खून आणि व्हायरल झालेली क्लिप यामुळे तीन दिवसांपासून शहरात तणाव पसरला आहे. त्यात आता पोलिसांनी खुनाच्या सुपारीकडे लक्ष वळविले आहे. एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. संबंधिताची गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शफियोद्दीन शेख याने सुपारी घेतली होती. त्याला दमही दिला होता. याची चाहूल लागताच सुपारी उलटविण्यात आली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एकीकडे मारेकऱ्यांचा सुगावा घेताना पोलिसांनी राजकारणी व्यक्तीवरही पाळत ठेवली आहे. त्याची इत्थंभूत माहिती हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भैय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणी ३ जणांना अटक

News Desk

वाशिम जिल्हा कृषी विकास अधिकारी धापाते लाच घेतना रंगे हात अटक

News Desk

सनातनच्या साधकाच्या घरातून स्फोटके केली जप्त

swarit