HW News Marathi
क्राइम

मुदखेडमध्ये पकडली गांजाची झाडे

 

स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई

उत्तम बाबळे

नांदेड: मुदखेड जवळ एका शेतात केलेली गांजा लागवडीची झाडे नांदेड जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे.या गांजांच्या झाडांची संख्या ५५ असून वजन २५ किलो आहे.त्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे.

नांदेड गुन्हा शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांना १५ जानेवारी २०१७ रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मुदखेड जवळील वसंतनगर तांडाच्या पूर्वेस असलेल्या उमेश कन्हैयालाल शर्माच्या शेतात गांजा या अमली पदार्थाच्या झाडांची लागवड केल्याचे समजले.तेव्हा नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना ही माहिती देऊन त्यांच्या कडून सूचना घेऊन विनोद दिघोरे आणि पोलीस कर्मचारी सदाशिव आव्हाड,राजू पांगरीकर,मुळके आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी मुदखेड गाठले.गाजाची झाडे लागवड केलेल्या गट क्रमांक ५३६ मधील शेतात जाऊन तपासणी केली तेव्हा तेथे ५५ गांजाची झाडे लावलेली असल्याचे निदर्शनास आले.सोबतच पोलिसांनी गांजाची लागवड करणारा उमेश शर्मा (४०) रा.मुदखेड यास सुद्धा ताब्यात घेतले आहे.

अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याला केराची टोपली दाखवीत उमेश शर्मा यांनी गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केली आहे.अशी तक्रार विनोद दिघोरी यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.उपरोक्त फिर्यादी वरुन उमेश शर्मा विरुद्ध अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगर:विषारी दारु विक्रीमुळे मृत्युस कारणीभुत असलेले ३ जण नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

News Desk

स्वताच्या नातीवर केला बलात्कर

News Desk

भावना गवळींचा ईडी चौकशीला नकार; हे आहे कारण

News Desk